Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भंडारा रूग्णालय दुर्घटनेतील दोषींवर त्वरीत कारवाई करू, कुटुंबीयांचे केले सांत्वन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

भंडारा रूग्णालय दुर्घटनेतील दोषींवर त्वरीत कारवाई करू, कुटुंबीयांचे केले सांत्वन

Surajya Digital
Last updated: 2021/01/10 at 9:44 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

भंडारा :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. येथे लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झालाय. या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पथकात मुंबई मनपातील अग्निशमन दल प्रमुख यांचा समावेश असेल. या घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आग प्रकरणानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाला भेट दिली. तसंच, या दुर्घटनेत जीव गमावलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबांचीही त्यांनी भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मी आता या कुटुंबीयांना भेटलो, यावेळी हात जोडून उभं राहण्याखेरीज माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते, कुटुंबीयांचे सांत्वन करता येईल असे शब्द निदान माझ्याकडे तरी नाहीयेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेवर भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी केली. तसंच, या आगीत प्राण गमावलेल्या चिमुकलीचे पालक बेहरे यांची भेटही त्यांनी घेतली. या पालकांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ही दुर्घटना आम्ही अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही समितीची स्थापना केली आहे. मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अधिकारी प्रभात रहांगदळे या चौकशी समितीत असतील. ही दुर्घटना कशी घडली हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं ठाम आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #रूग्णालय #दुर्घटनेतील #दोषींवर #त्वरीत #कारवाईकरू #कुटुंबीयांचे #केले #सांत्वन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाशिक हादरले! 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
Next Article कोरोना लस घेतल्यावर भारत,अमेरिका, पोर्तगाल, मेक्सिकोत मृत्यू झाल्याने खळबळ

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?