Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना लस घेतल्यावर भारत,अमेरिका, पोर्तगाल, मेक्सिकोत मृत्यू झाल्याने खळबळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

कोरोना लस घेतल्यावर भारत,अमेरिका, पोर्तगाल, मेक्सिकोत मृत्यू झाल्याने खळबळ

Surajya Digital
Last updated: 2021/01/10 at 10:14 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

नवी दिल्ली : जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र याच दरम्यान कोरोना लसीचे साईड इफेक्ट पाहायला मिळत आहे.

मेक्सिकोमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला होता. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे.

अमेरिकेच्या मियामी शहरात कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मियामीतील डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ग्रेगरी मायकल यांनी फायजरची लस घेतली होती. त्यांची पत्नी हेइदी नेकेलमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी ग्रेगरी यांनी लस घेतली. त्याआधी त्यांची प्रकृती ठणठणीत होती. इतकंच नव्हे तर त्यांना कोणताही आजार नव्हता. कोरोना लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांची प्रकृती बिघडल्याचा दावा पत्नीने केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

डॉक्टर ग्रेगरी यांची प्रकृती चांगली होती. त्यांनी सिगरेट कधीच घेतली नाही. कधी कधी काही प्रमाणात मद्य घेत असे. तसेच दररोज व्यायामही करायचे असं हेईदी यांनी म्हटलं आहे. कोरोना लसीमुळे डॉक्टर ग्रेगरी यांचा मृत्यू झाला असं आम्ही मानत नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. डॉक्टरांच्या मृत्यूची चौकशी सुरू असल्याचं फायजरने सांगितलं आहे. लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांच्या प्रकृतीत कोणताही साईड इफेक्ट आढळून आला नाही. तीन दिवसानंतर त्यांच्या शरीरावर लाल चट्टे पडले असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तपासणी केली असता त्यांच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे दिसून आलं. यानंतर डॉक्टरचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला आहे. या महिला डॉक्टरने लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांना अशक्तपणा, डोकेदुखी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. कार्ला सेसेलिया पेरेज असं महिला डॉक्टरचं नाव असून त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मेक्सिकोच्या आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. लसीचा दुष्परिणाम झालेल्या डॉक्टर कार्ला पेरेझ यांच्या मेंदूत आणि मणक्यात सूज आली होती. त्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

डॉक्टर कार्ला यांना अँटीबायोटीकची एलर्जी असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर कार्ला यांना अर्धांगवायूचा झटका हा लसीमुळे आला असे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र लसीमुळे हा दुष्परिणाम झाला का हे तपासले जात आहे. लसीमुळेच अर्धांगवायूचा झटका आला का हे पाहण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे डॉक्टर कार्ला यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

काही ठिकाणी कोरोना लसीचे साईड इफेक्ट देखील समोर आले आहेत. पोर्तुगालमध्ये कोरोनावरील फायझर लस घेतल्यानंतर 48 तासांच्या आत एका आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनिया असेवेडो असे या 41 वर्षीय महिलेचे नाव असून फायझर लसीचा डोस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. मात्र, त्यांचा अचानक मृत्यू झाला.

* लस घेतलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू, भारतातील पहिलं प्रकरण

मध्य प्रदेशात कोरोनाच्या कोव्हॅक्सिन लशीच्या वैद्यकीय चाचणीत सहभागी झालेल्या दीपक मारावी या स्वयंसेवकाचा लस टोचल्याच्या 10 दिवसांनंतर मृत्यू झाला. मारावींना 12 डिसेंबरला लस देण्यात आली. यानंतर घरी आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नंतर तब्येत खालावली व 21 डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. व्हिसेरा तपासल्यानंतरच मृत्यूचे कारण समजेल, असं मेडिको लीगल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर अशोक शर्मांनी म्हटलंय.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #कोरोनालस #घेतल्यावर #भारत #अमेरिका #पोर्तगाल #मेक्सिकोत #डॉक्टरांचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भंडारा रूग्णालय दुर्घटनेतील दोषींवर त्वरीत कारवाई करू, कुटुंबीयांचे केले सांत्वन
Next Article उपमहापौर राजेश काळेबाबत निर्णयाचा अधिकार चंद्रकांतदादांना – प्रवीण दरेकर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?