Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवारांसह ‘यांनी’ही घेतली खासदारकीची शपथ; या तीन खासदारांनी घेतली मराठीतून शपथ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांसह ‘यांनी’ही घेतली खासदारकीची शपथ; या तीन खासदारांनी घेतली मराठीतून शपथ

Surajya Digital
Last updated: 2020/07/22 at 3:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन आदी कारणामुळे लांबणीवर पडलेला राज्यसभेच्या नवनियुक्त खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला. या वेळी महाराष्ट्रातील शरद पवार, उदयनराजे भोसले, प्रियंका चतुर्वेदी, डॉ. भागवत किशनराव कराड, राजीव सातव आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खासदार पदाची शपथ घेतली. कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका ओळखून सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करत हा सोहळा पार पडला.

महाराष्ट्रातील खासदारांसोबतच देशातील इतर राज्यांतील नवनियुक्त सदस्यांनीही राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. उल्लेखनीय असे की मराठी बाणा कायम ठेवत काँग्रेस खासदार राजीव सातव, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजपचे खासदार भागवत कराड यांनी मराठीतून शपथ घेतली आहे. त्यामुळे या तिन्ही खासदारांवर राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर शरद पवार यांनी हिंदीतून आणि उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली आहे.

राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला.

देशात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या लॉकडाऊनच्या काळात संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं होतं. दरम्यान या सोहळ्यासाठी आज संसदेची दार उघडण्यात आली. देशभरातील एकूण ६२ खासदार निवडून आले असून त्यांचा शपथिविधी सोहळा हा अधिवेशनात पार पडणार आहे. आज केवळ काही मोजक्याचं नेत्यांनी शपथ घेतली.

खासदार डॉ. भागवत कराड यांनी आपण मराठीतून शपथ घेणार असल्याचे आधीच सांगितले होते. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले होते,मराठी ही माझी मातृभाषा आहे म्हणून मी मराठीत शपथ घेणार व मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असे डॉक्टर भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

 

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

TAGGED: #खासदारकीशपथ #मराठीतून #शरदपवार #उदयनराजेभोसले #चतुर्वेदी #सातव #आठवले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तुमच्या डोक्यावरचे केस कमी झालेत, हा सहा महिन्यांचा परिणाम आहे का?; पवारांनंतर आता मुख्यमंञ्यांची मुलाखत
Next Article शिराळ्याची सर्जेराव नाईक बँक बोगस कर्जव्यवहाराने गाजू लागली

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?