Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आत्महत्येची चिठ्ठी लिहून शेतकरी बेपत्ता; अनर्थ घडल्यास मंत्री, तहसीलदार, ठाणेदार जबाबदार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

आत्महत्येची चिठ्ठी लिहून शेतकरी बेपत्ता; अनर्थ घडल्यास मंत्री, तहसीलदार, ठाणेदार जबाबदार

Surajya Digital
Last updated: 2021/01/13 at 9:51 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

अमरावती : आत्महत्येची चिठ्ठी लिहून अमरावतीमधील एक शेतकरी बेपत्ता झाला आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने पोलिसांच्या धमकीला वैतागल्याचा उल्लेख केला आहे. यानंतर पत्नीने पोलिसात धाव घेऊन माझ्या पतीने आत्महत्या केल्यास राज्यमंत्री बच्चू कडू, तहसीलदार, ठाणेदार जबाबदार राहतील, अशी तक्रार दाखल केली आहे.

अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील विजय सुखदेव सुने (वय 40 वर्षे) हा शेतकरी सोमवारी (11 जानेवारी) रात्रीपासून बेपत्ता आहे. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी सापडली सोबतच मोबाईल फोनही घरीच असल्याचं समोर आलं आहे. चिठ्ठीत पोलिसांच्या सततच्या धमकीने वैतागल्याचा उल्लेख आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

माझ्या पतीने आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खासगी सचिव, तहसीलदार, ठाणेदार, बिट जमादार हे जबाबदार राहतील, अशी तक्रार संबंधित शेतकऱ्याची पत्नीने शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात दिली आहे.

तक्रारीत म्हटलं आहे की, “पोलिसांच्या सततच्या धमकीने वैतागल्याचा उल्लेख पतीने चिठ्ठीत केला आहे. माझ्या पतीने जर आत्महत्या केली तर याला ठाणेदार सचिन परदेशी, बिट जमादार तायडे यांना जबाबदार धरुन खुनाचा गुन्हा दाखल करावा.” याशिवाय चांदूरबाजार येथील तहसीलदार धीरज थुल, राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांचे खाजगी सचिव दीपक भोंगाडे यांच्या नावाचा उल्लेखही तक्रारी करण्यात आला आहे.

दरम्यान शिरजगाव कसबा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोन पथकं तातडीने शोधमोहीमेसाठी पाठवण्यात आली आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #आत्महत्येची #चिठ्ठीलिहून #शेतकरी #बेपत्ता #अनर्थ #घडल्यास #मंत्री #तहसीलदार #ठाणेदार #जबाबदार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवीन तिन्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती
Next Article दहा वर्षांपासून रडतखडत चाललेला सोलापुरातील साखर कारखाना रोहित पवारांनी घेतला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?