Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यिक यशवंत मनोहरांनी पुरस्कारच नाकारला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यिक यशवंत मनोहरांनी पुरस्कारच नाकारला

Surajya Digital
Last updated: 2021/01/15 at 12:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नागपूर : पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यिक यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवन व्रती पुरस्कार नाकारला आहे. कवी आणि विचारवंत यशवंत मनोहर यांनी त्यांना देऊ केलेला जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार वितरण समारंभात सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याऐवजी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख किंवा ताराबाई शिंदे यांची प्रतिमा ठेवावी, अशी मागणी त्यांनी विदर्भ साहित्य संघाकडे केली होती.

विदर्भ साहित्य संघाच्या 98 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना जीवनव्रती पुरस्कार दिला जाणार होता. मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या साहित्यिकांना कै.ग.त्र्यं.माडखोलकर यांच्या नावाने जीवनव्रती पुरस्कार दिला जातो. यावेळी हा पुरस्कार आंबेडकरवादी साहित्यिक यशवंत मनोहर यांना देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. 14 जानेवारीला विदर्भ साहित्य संघाच्या 98 व्या वर्धापन दिनाला त्यांना हा पुरस्कारही देण्यात येणार होता. पण त्यांनी व्यासपीठावर सरवस्तीची प्रतिमा ठेवण्यावर आक्षेप घेतला, तसंच आपण हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. मागणी केल्यानंतरदेखील परंपरेप्रमाणे सरस्वतीची प्रतिमा ठेवण्यात आली, यामुळे नाराज मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.

“डॉ.ओरकेंनी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चौकशी केली, पण तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल, असं  वाटलं होतं, पण ते झालं नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे”, असे पत्र डॉ. मनोहर यांनी साहित्य संघाला पाठवले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणा-या शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतःनाकारलीच आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं  मला अजिबात मान्य नाही”, असेही त्यांनी म्हटलं आहे.

मात्र साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी सरस्वतीचा फोटो हा साहित्य संघाची प्रथा-परंपरेचा भाग असून हॉलचे नावचं रंगशारदा असल्याचे सांगितले. या वेळी महाराष्ट्रातील इतर अनेक लेखकांना त्यांच्या साहित्यासाठी पुरस्कृत करण्यात आले.

इंग्रज यायच्याआधी भारतात सरस्वतीलाच पूजलं जात होतं, पण मग तरीही देशातील स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र का अज्ञानी राहिले? माझा सरस्वतीशी काय संबंध? कार्यक्रम साहित्याशी संबंधित आहे, मग त्यात कुसुमाग्रज, मुक्तीबोध किंवा इंदिरा संत यांची प्रतिमा ठेवायला हवी. मी माझं मत विदर्भ साहित्य संघाला कळवलं, पण त्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे मी हा पुरस्कार नाकारला,’ असं यशवंत मनोहर म्हणाले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #सरस्वतीची #प्रतिमाठेवली #साहित्यिक #यशवंतमनोहरांनी #पुरस्कारच #नाकारला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंडे प्रकरणात हस्तक्षेप नाही, मंत्रिमंडळात फेरबदलाची गरज नाही
Next Article रेणू शर्माचे ट्वीट, तुमची हीच इच्छा असेल तर मी माघार घेते, देव तुमचं भलं करो

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?