मुंबई : भारताचे सर्वोत्तम क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आज मुंबईच्या वरिष्ठ संघातून पदार्पण केले. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हरियाणा विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघात अर्जुन तेंडुलकरचा समावेश करण्यात आला. अर्जुन डावखुरी गोलंदाजी करण्याबरोबर उपयुक्त फलंदाजीसुद्धा करतो.
अर्जुन आतापर्यंत विविध वयोगट स्तरांवरील स्पर्धांमध्ये खेळला आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात त्याचा संघात समावेश करण्यात आला. अर्जुन तेंडुलकरला पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली नाही. पण ग्रुप ई च्या तिसऱ्या सामन्यात अर्जुनचा संघात समावेश करण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अर्जुन अंडर-१९ आणि अन्य वयोगटातील स्पर्धेत मुंबईकडून खेळला आहे. अर्जुनने २०१८ साली अंडर-१९ स्पर्धेत भारताकडून पदार्पण केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-१९ युथ टेस्ट सीरिजमध्ये त्याचा संघात समावेश करण्यात आला होता.
सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ या स्पर्धेत खेळत आहे. अर्जुनने याआधी भारताच्या वरिष्ठ संघासोबतही नेट गोलंदाज म्हणून दौरा केला आहे. २०१७ साली इंग्लंडच्या वरिष्ठ संघासोबत त्याने सराव केला होता. त्यावेळी यॉर्कर टाकण्याच्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.