सोलापूर : राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे उद्या शनिवारी सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता हेलिकॉप्टरने ते सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर सोलापूर महापालिकेमध्ये ते आढावा बैठक घेणार आहेत. महानगरपालिका अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा ते या बैठकीत घेणार आहेत.
या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील संबंधित नगर परिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत दुपारी 4 पर्यंतचा वेळ हा त्यांनी राखून ठेवला आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते उस्मानाबादकडे जाणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महापालिका आयुक्त व इतर अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास मंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहेत. जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायती अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा घेणार आहेत.
* कोठेंची टीका लागली जिव्हारी, होऊ शकते मनधरणी
अनेक घडामोडीनंतर महेश कोठे यांनी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल करत राज्यामध्ये शिवसेेनेची सता आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तरी देखिल सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी सोलापूरच्या विकास संदर्भात एकही बैठक लावली नसल्याची खंत व्यक्त केली होती.
सत्ता असताना काम करणार आहेत का नाही असा टोलाही लगावला होता. कोठे यांनी व्यक्त केलेली खंत शिवसेना पदाधिकाऱ्यांना चांगली जिव्हारी लागली होती. या वृत्ताची दखल घेत सोलापूरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यात सोलापूर शहरातील विविध कामासंदर्भात अधिका-यांसमवेत बैठका घेऊन आढावा घेतला जाणार आहे. या वेळी कोठे यांची मनधरणी देखील एकनाथ शिंदे यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. एकंदरीत कोठे यांची टीका सोलापूरच्या स्थानिक पदाधिका-यांच्या जिव्हारी लागल्याने एकनाथ शिंदेंच्या दौ-याचे नियोजन केल्याचे बोलले जात आहे.