सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी राञी बारापर्यंत घेतलेल्या एक हजार दोन टेस्टमध्ये 64 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तो अहवाल आज बुधवारी महापालिकेकडून देण्यात आला. यात चारजणांचा मृत्यू आहे. माञ कोरोनाग्रस्तांचा चार हजाराचा टप्पा पूर्ण झाला आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 4052 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 2436 तर महिला 1616 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 333 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 217 तर महिला 116 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 21 हजार 529 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 17 हजार 192 आहे. तर 4 हजार 52 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1477 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 2 हजार 242 आहे. काल मंगळवारी 4 बळी गेले आहेत. त्यात एमआयडीसी अक्कलकोट रोड परिसरातील 49 वर्षाचे पुरुष, थोबडे वस्ती परिसरातील60 वर्षाचे पुरूष. अमृतनगर विजापूर रोड परिसरातील 51 वर्षाचे पुरुष आणि प्रताप नगर विजापूर रोड परिसरातील 39 वर्षांच्या पुरूषाचा समावेश आहे.
* नव्याने आढळून आलेले रुग्ण
होटगी रोडवरील अंबिका नगरात दोन, देगाव, स्वागत नगर, सिध्देश्वर नगर (नई जिंदगी), प्रेम नगर (जुळे सोलापूर), रेल्वे लाईन, शुक्रवार पेठ, भवानी पेठ, गांधी नगर (दक्षिण सदर बझार), देशमुख गल्ली (नवी पेठ), पापाराम नगर (विजयपूर रोड), एसआरपी कॅम्प, कुमठा नाका, मुमताज नगर, शुक्रवार पेठ, लक्ष्मी नगर (हत्तुरे वस्ती), आदित्य नगर, लिमयेवाडी, सिध्देश्वर पेठ, एकता नगर, भारतरत्न इंदिरा नगर, बालाजी सोसायटी (कुमठा नाका), काडादी नगर (होटगी रोड) याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत.
तसेच सलगर वस्ती दोन, मल्लिकार्जुन नगरात चार, शेळगीतील माफणे अपार्टमेंटमध्ये सहा, शेळगी व भवानी पेठेत प्रत्येकी दोन, मंजुषा सोसायटीत (विकास नगर) सर्वाधिक दहा रुग्ण आढळले आहेत. तर गुलमोहर सोसायटी (वसंत विहार), बुधले गल्ली, स्वामी विवेकानंद नगर येथे प्रत्येकी दोन रुग्ण आणि गणेश नगरात (बाळे) येथे सात रुग्ण आढळून आले आहेत.