मुंबई : शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वयाच्या 90 व्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथील घरात निधन झाले. सुमारे 15 वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला झाला होता, तेव्हापासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज रविवारी दुपारी 12 ते 12.15 दरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती उस्ताद मुस्तका खान यांचा मुलगा रब्बानी मुस्तान खान यांनी दिली.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी रविवारी दुपारी 12.37 वाजता अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. सकाळी त्यांची प्रकृती ठीक होती, मात्र दुपारी अचानक त्यांची प्राणज्योत मालवली.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991 मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही देण्यात आला आहे. सायंकाळी सांताक्रूझ दफनभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्यासोबत काम केलेल्या भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार ए. आर. रहमान यांनी त्यांच्या निधनाबद्धल शोक व्यक्त केला आणि सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्म भूषण आणि 2018 मध्ये पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 2003 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारनं गौरवण्यात आलं.
सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं, “मला आताच बातमी समजली की महान शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी जगाचा निरोप घेतला आहे. हे ऐकून मला खूप दु:ख झालं आहे. ते गायक तसंच माणूस म्हणूनही खूप चांगले होते.”
सरोद उस्ताद अमजद अली खान यांनी ट्वीट केलं, “उस्ताद गुलाम मुस्तफा यांच्या निधनानं दु:ख झालं. ते एक प्रतिष्ठित गायक होते. ते नेहमीच आमच्या हृदयात राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.”