Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहाटेच्या ‘शपथविधी’बाबत केला मोठा ‘गौप्यस्फोट’; व्हायरल होताच व्हिडिओ डिलिट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

पहाटेच्या ‘शपथविधी’बाबत केला मोठा ‘गौप्यस्फोट’; व्हायरल होताच व्हिडिओ डिलिट

Surajya Digital
Last updated: 2021/01/18 at 2:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नागपूर : नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान २०१९ च्या २३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे उभ्या महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. तसाच भूकंप देवेंद्र फडणवीसांनी फेसबुक लाईव्हदरम्यान ‘गौप्यस्फोट’ करुन केलाय. सध्या याबाबत चर्चा होत आहे.

या फेसबुक लाईव्हच्या भाषणातील मुद्द्यावरून मोठा गहजब उडाल्यानंतर व्हिडिओ डिलिट केलाय. पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवार नेमके एका रात्रीतून महाविकासआघाडीच्या गोटातून भाजपसोबत कसे काय निघून गेले? या बुचकळ्यात आख्खा महाराष्ट्र पडला होता. अखेर आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच त्यावर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘२३ नोव्हेंबरला अजित पवारांसोबत झालेला शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच झाला होता. राजकारणात नैतिकता असणं आवश्यक आहे. पण नैतिकता जोपासण्यासाठी राजकारणात तरी जिवंत असायला हवं. म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत जायचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रक्रियेबाबत अजित पवार नसून थेट शरद पवार यांच्याशीच चर्चा झाली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शिवाय सरकार स्थापनेचा प्रस्ताव देखील शरद पवार यांच्याकडूनच आला होता. इतकंच नाही, तर तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं जे पत्र राष्ट्रवादीकडून राज्यपालांना देण्यात आलं होतं, ते देखील मीच लिहिलं होतं’, असा धक्कादायक खुलासा फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या खुलाशामुळे राज्यातलं वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी लागणारे ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल भावी राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. ‘शिवसेनेने विरोधकांची हातमिळवणी केल्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं, त्यामुळेच आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं’, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले होते.

दरम्यान, फडणवीस बोलत असलेल्या या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांचे कॅमेरे उपस्थित नव्हते. मात्र, या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह सुरू होतं. पण शपथविधीचा उल्लेख आल्यानंतर काही वेळातच हे लाईव्ह बंद झालं आणि त्याचा व्हिडिओ डिलीट झाल्याचं सांगितलं जात आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #पहाटेच्या #शपथविधीबाबत #केलामोठा #गौप्यस्फोट #व्हायरलहोताच #व्हिडिओ #डिलिट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आदर्श गावातील भास्करराव पेरे – पाटील यांचे वर्चस्व संपुष्टात, मुलीचा झाला पराभव
Next Article मुक्ताईनगरमध्ये नाथाभाऊंचे वर्चस्व, भाजपला फरक पाडून दाखविला

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?