पुणे : आतापर्यंत पत्नीला खांद्यावर घेऊन नाचणारे पाहिले. मात्र काल झालेल्या ग्रामपंचायत निकालात उलटेच घडले. चक्क पत्नीने आपल्या पतीला खांद्यावर घेऊन विजयाचा आनंद हटक्या पद्धतीने साजरा केला. सध्या राज्यभर हे फोटो व्हायरल होऊ लागलेत.
संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक निकालाची काल उत्सुकता होती. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांचे त्या निकालाकडे लक्ष लागले होते. निकाल लागले आणि त्यानंतर सुरु झाला एकच जल्लोष. तसेच घरोघरी आपापल्यापरीने आनंदोत्सव साजरा करत होते. मात्र एकी ठिकाणी पत्नीने खांद्यावर उचलून घेत आपल्या विजयी पतीची त्यांची गावभर मिरवणूक काढली.
निवडणुकीमध्ये एखादा नेता निवडून आला तर कार्यकर्ते त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष करतात. महिला निवडून आली तर तिचे पती, भाऊ तिला दोन्ही दोन्ही हाताने उचलून घेतात. मात्र पती निवडून आला म्हणून धाकड पत्नीने खांद्यावर उचलून मिरवणूक काढावी, अशी घटना पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या पाळू गावात घडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी 221 मते मिळवत विरोधी उमेदवारावर 44 मतांनी विजय मिळविला. त्यामुळे त्यांच्या पत्नी रेणुका गुरव यांनी आनंदोत्सव साजरा करताना पतीराजांना थेट खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढली.
यंदा कोरोनामुळे जास्त कार्यकर्त्यांना एकत्र जमण्यास बंदी असल्यानं त्या कायद्याच पालन करताना मिरवणुकीचा जल्लोष करण्यासाठी कार्यकर्त्यांपासून ‘फिजिकल डिस्टन्स’ पाळताना रेणुकां यांनी स्वत:च पतीराजांना खांद्यावर घेत आनंद साजरा केला.
सध्या त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये चांगलेच व्हायरल होत आहे. अनेकांनी पत्नीच्या खमकेपणा कौतुक करताना संतोष गुरव यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.