कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सभेच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यावर बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत. यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या बॉम्ब हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांची आज खेजुरी येथे सभा आहे. त्या आधी तिथे हे हल्ले झालेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीनेच हा बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या सभेच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. तसेच या सभेच्या ठिकाणी बॉम्बफेक करण्यात आल्याने या हल्ल्यात भाजपचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या बॉम्ब हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीनेच हा बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप भाजने केला आहे. तसेच या प्रकरणात राज्यपालांनी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणीही भाजपने केली आहे.
दरम्यान, टीएमसीकडून करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्याची गंभीर दखल घेऊन राज्यापालांनी याप्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेऊन केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुवेंदू अधिकारी यांची आज खेजुरी येथे सभा आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. कालच ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधून सुवेंदू यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर भाजपकडून या सभेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार होते. त्यासाठी संपूर्ण तयारी भाजपने केली होती.
मात्र, सभा होण्यापूर्वीच अज्ञातांनी सभेच्या ठिकाणी घुसून भाजप कार्यकर्त्यांवर जोरदार हल्ले चढवले आणि बॉम्बफेक करून गोंधळ उडवू दिला. त्यामुळे सभेकडे जाणाऱ्यांमध्येही घबराट निर्माण झाली. बॉम्बफेक करणाऱ्यांनी सभेकडे जाणाऱ्यांनाही टार्गेट केलं होतं, असा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. टीएमसी कार्यकर्त्यांनी बराच वेळ सभेकडे येणाऱ्यांच्या दिशेने बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आमचे अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे. या ठिकाणी पोलिसांच मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून सभा स्थळाला छावणीचं रुप आलं आहे.