कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पडलेल्या दाट धुक्यामुळे जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे एक भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. आज बुधवारी पहाटे जलपाईगुडीच्या धुपगुरी येथे मायनाताली रोडवर हा अपघात झाला.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर भारतासह देशातील अनेक भागांत आज कडाक्याच्या थंडी पडली आहे. त्यामुळे दाट धुके पहायला मिळत आहेत. यावेळी धुक पडल्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या डंपरने अनेक वाहनांना धडक दिली. अपघातानंतर गोंधळ उडाला. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील पीडित एका विवाह सोहळ्याला हजेरी लावून घरी परतत होते.
एका लग्न वऱ्हाडाच्या बसचा जलपैगुडी जिल्ह्यात जलढाका ब्रिजजवळ अपघात झालाय. मृतांमध्ये दोन पुरूष, सहा महिला, चार लहान मुलांचा समावेश आहे. तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास दाट धुकं पाहायला मिळत आहेत.