मुंबई : राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं सुरक्षेत कपात करुन दणका दिला आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. मात्र आता अशा लोकांना केंद्र सरकारनेच मोठी सुरक्षा पुरविल्याने चर्चा होत आहे.
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, हे वृत्त समोर येताच ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्याचं आणि कोकणाचं नेतृत्व केलंय. त्यांना पुरवलेली सुरक्षा काढून घेतली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना सुरक्षा देण्यात आली आहे. हा माजी मुख्यमंत्र्यांसोबत केलेला दुर्व्यवहार आहे. यापूर्वी राज्यात असं कधीही घडलं नाही,” अशी टीका माजी मंत्री भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली होती.
दरम्यान,एका बाजूला ठाकरे सरकार कठोर निर्णय घेत असताना आता नारायण राणे यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. नारायण राणे यांच्या ताफ्यात आता 12 सीआयएस एफचे जवान तैनात असणार आहेत.
