Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमोल जगताप आत्महत्या प्रकरण; नगरसेवकासह दोघांना अटक, एकूण सहाजणांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

अमोल जगताप आत्महत्या प्रकरण; नगरसेवकासह दोघांना अटक, एकूण सहाजणांना अटक

Surajya Digital
Last updated: 2020/07/22 at 9:23 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : हांडे प्लॉट येथील बिल्डिंगमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नी व दोन मुलांना गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अमोल जगताप यांच्या प्रकरणात पोलिसांनी नगरसेवक लक्ष्मण जाधव यांना धूळखेड (ता. इंडी) येथून अटक केली आहे. त्याच्यासोबत दशरथ कसबे यासही अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात बेकायदेशीर सावकारकीची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणात यापूर्वी तीन सावकारांना अटक केलेली आहे. नगरसेवक जाधव यांनी मोठी रक्कम जगताप यास व्याजाने दिल्याची माहिती आहे. जाधव हे मोटरसायकलवरून विजापूरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि अजित कुंभार आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना धुळखेड येथे अटक केली. याबाबत जळकी पोलीस ठाण्याला सविस्तर रिपोर्ट देऊन त्यांना सोलापुरात आणण्यात आले.

नगरसेवक लक्ष्मण यल्लप्पा जाधव (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी) यांच्याबरोबरच दशरथ मधुकर कसबे (वय ४५, रा. मुकुंद नगर, भवानी पेठ) यासही अटक करण्यात आली आहे. त्यांनी ही अमोल जगताप याला व्याजाने रक्कम दिल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. यापूर्वी सिद्धाराम मल्लप्पा बिराजदार (वय ४०, रा वारद चाळ, मुरारजी पेठ), दिनेशकुमार उर्फ बंडू दिलीप बिराजदार ( वय २८, रा. वारद चाळ, भैय्या चौक), व्यंकटेश पंपण्णा बंडलदिनी (वय ४७ रा. मार्केट यार्ड, हैदराबाद रोड) या सावकाराला अटक केलेली आहे. या सावकारांनी पैशासाठी तगादा लावल्यामुळे अमोल जगताप यांनी पत्नी आणि मुलांचा खून केला आणि स्वतःही आत्महत्या केली, असे पोलिस तपासात समोर येत आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #अमोलजगताप #हंडेप्लॉट #बेकायदेशीरसावकारकी #नगरसेवक #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर ग्रामीणमध्ये आज 134 कोरोना बाधित; सर्व तालुक्यास बार्शीने टाकले मागे
Next Article नववधू निघाली कोरोना पॉझिटिव्ह; टेंभुर्णीकरांचे टेन्शन वाढले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?