Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु, पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु, पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन

Surajya Digital
Last updated: 2021/01/20 at 10:36 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

टेंभुर्णी : उजनी धरणातून  शेतीला रब्बी हंगामासाठी आज बुधवारपासून भीमा नदीपात्र, मुख्य कालवा, भीमा- सीना जोड कालवा (बोगदा), सीना- माढा सिंचन योजना ( माढा तालुका), दहिगाव उपसा सिंचन  (करमाळा) या योजनेद्वारे चालू वर्षातील  पाण्याचे आवर्तन ( रोटेशन) सुरू झाले आहे. लाभक्षेत्रात असलेल्या शेतीला  पहिले पाणी मिळणार आहे. कालव्याचे आवर्तन ३० दिवस चालणार असून अंदाजे सहा टीएमसी पाणी वापर होणार आहे.

२०२० च्या पावसाळ्यात सर्वत्र समाधानकारक   पाऊस झालेला असल्यामुळे उजनीच्या वरील सर्व धरणे  शंभर टक्के भरलेली आहेत.  नंतर उजनी धरणात देखील १५  ऑक्टोबर २० पर्यंत १११ टक्के म्हणजेच १२३ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला. चालू पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे उजनीतून  82 टीएमसी अतिरिक्त पाणी वेळोवेळी भीमा नदीत सोडण्यात आले. यामुळे  पाण्याची भूजल पातळी ( ग्राउंड वॉटर लेवल) यावर्षी चांगली असल्यामुळे १५ जानेवारी २१ पर्यंत शेतीसाठी धरणातून आवर्तन सोडण्यात आले नाही. आता मागणीनुसार पाण्याचे आवर्तन सुरु केले असल्याचे असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले.

१८  जानेवारीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा पाणी वाटप समितीची ऑनलाईन बैठक झाली होती. यामध्ये  ठरलेल्या नियोजनाप्रमाणे २०  जानेवारीपासून शेतीचे रब्बी आवर्तन सुरू करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यामुळे मुख्य कालवा व डाव्या कालव्यातून  माढा, पंढरपूर( उत्तर- पश्चिम भाग) मोहोळ ,उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातुन पुढे अक्कलकोट पर्यंत तर उजव्या कार्यामधून माळशिरस (पूर्वभाग )पंढरपूर ( पश्चिम दक्षिण भाग ), मंगळवेढा व सांगोला या  तालुक्यातील चार लाख एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे तर उजव्या कालव्यातून तीन लाख पन्नास हजार एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. नदीपाञातून सोडलेले हे पाणी  दहा ते अकरा दिवस राहणार आहे.

सोलापूरला पाणीपुरवठा करणारे चिंचपोकळी व टाकळी बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे १७ बंधाऱ्यात पाणी अडवले जाणार आहे. नदीच्या पाण्यामुळे  पिण्यासाठी व शेतीसाठी उपयोग होणार आहे. एकूण सहा टीएमसी पाणी वापरण्यात येणार आहे.

करमाळा तालुक्यातील दहीगाव उपसा सिंचन योजना 22 किंवा 23 जानेवारीला  चालू होणार असून या योजनेतून करमाळा तालुक्यातील  22 हजार एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे ,तसेच या योजनेसाठी अंदाजे एक टीएमसी पर्यंत पाण्याचा वापर होणार आहे.

* उजनी पाणी पातळी

– पाणी पातळी 497.015 मीटर

– एकूण साठा ते 3082.57 दशलक्ष घन मीटर
-119.44 टीएमसी
– उपयुक्त साठा 1579.76 दशलक्ष घनमीटर 55.88   टीएमसी

– टक्केवारी 104 टक्के        

– बाष्पीभवन – चार मिलिमीटर

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #उजनीधरणातून #भीमानदीपात्रात #पाण्याचा #विसर्गसुरु #पिण्याच्या #पाण्यासाठी #आवर्तन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेचे मावळते अध्यक्षही म्हणाले ‘आम्ही पुन्हा येऊ’; व्हाईटहाऊस केले खाली
Next Article दिव्या दत्ताचा ‘धाकड’मधला दमदार ‘लूक’ आला समोर

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?