Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, टीम इंडियाला क्वॉरन्टाईनच्या नियमातून सूट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, टीम इंडियाला क्वॉरन्टाईनच्या नियमातून सूट

Surajya Digital
Last updated: 2021/01/21 at 12:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारताचा क्रिकेट संघ मायदेशी परतला. यावेळी मुंबई विमानतळावर परतलेल्या खेळाडूंना क्वॉरन्टाईनच्या नियमातून वगळण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि एमसीएचे सदस्य शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर ऑस्ट्रेलियातून परत आलेल्या टीम इंडियाला क्वॉरन्टीनच्या नियमातून सूट मिळाल्याचं समोर आलं आहे.


आज गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ मुंबई विमानतळावर परतले. परंतु मुंबईत परतलेल्या खेळाडूंसाठी क्वॉरन्टीनचे नियम शिथील करण्यात आले. कोरोनाच्या नियमामुळे विमानतळावर चाहत्यांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी फक्त पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केलं. ज्याच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली, त्या अजिंक्य रहाणेच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी विमानतळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

खेळाडूंना विलगीकरणात न ठेवण्याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत फोन केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियातून विजय मिळवून मुंबईत परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना विलगीकरणात न ठेवण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश महापालिकेला दिले. त्यानुसार खेळाडूंची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

टीम इंडियाचे पुढचे सामने चेन्नईला होणार आहेत. त्याआधी खेळाडूंना कुटुंबासमवेत काही वेळ घालवायचा होता. परंतु परदेशातून आल्यामुळे नियमानुसार त्यांना क्वॉरन्टाईन करावे लागले असते. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर खेळाडूंना क्वॉरन्टाईन न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

खेळाडूंच्या आतापर्यंत अनेकदा कोविड टेस्ट झाल्या असून त्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांनी ब्रेक जर्नी करतानाही संपूर्ण नियमांचं पालन केलं आहे, अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली आहे. सोबतच प्रशासनाने उत्तम सहकार्य केल्याचंही त्यांनी सांगितलं.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #शरदपवारांचा #मुख्यमंत्र्यांना #फोन #टीमइंडियाला #क्वॉरन्टाईनच्या #नियमातून #सूट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जो बायडन यांनी घेतली राष्ट्रध्यक्षपदाची शपथ, डोनाल्ड ट्रम्प यांची अनुपस्थिती, तामिळनाडूमध्ये आनंदोत्सव साजरा
Next Article ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार, रोहित पवारांनी केली सोलापुरात ‘बॅटींग’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?