Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार, रोहित पवारांनी केली सोलापुरात ‘बॅटींग’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार, रोहित पवारांनी केली सोलापुरात ‘बॅटींग’

Surajya Digital
Last updated: 2021/01/21 at 2:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोना काळात विजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चारपट नक्कीच झाला नसेल, असा अंदाज व्यक्त करीत रोहित पवारांनी राज्य सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. मात्र सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचंही रोहित पवारांनी सोलापुरात सांगितलं.

आमदार रोहित पवार यांनी आज गुरुवारी सकाळी सोलापूरच्या क्रिकेट मॅच खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी कार्यकर्त्यांना रोहित पवारांची वेगळीच झलक पाहवयास मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नूतनीकरण होत असलेल्या पार्क मैदानला भेट दिली. हे काम स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे. स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्याशी चर्चा केली.

पत्रकारांशी संवाद साधण्याअगोदर मैदानावर पत्रकारांसमवेत क्रिकेटचा आनंदही घेतला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रोहित पवार म्हणाले, ग्राहकांना आलेल्या बिलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा रिपोर्ट एमएसईबीने काढलाय का? तो रिपोर्ट काढण्याबाबत आदेश दिलेत का? असे सवाल विचारत, आदेश दिले असल्यास अहवाल काय आलाय, हे पाहावे लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.

थकित वीज बिलाच्या कारवाईबाबत रोहित पवारांनी काही सवाल उपस्थित केले. वाढीव वीज बिलाची शहानिशा करण्याची गरज आहे. वाढीव वीज बिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला, तेवढेच बिल द्यावे. यासाठी सरसकट धोरण करता येईल का, याचा अभ्यास राज्य सरकारने करावा, असंही रोहित पवारांनी सुचवलं.

तसेच, तरुणांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचं आहे. महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर काम करते. त्यामुळे अनेक प्रश्नांवर काम करायचे आहे” असे रोहित पवार म्हणाले.

* सोलापूर विद्यापीठालाही भेट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला रोहित  पवारांनी भेट दिली. येथील गुण वाढवण्याच्या गैरप्रकारावर सवाल विचारला असता नाराजी व्यक्त केली.

ज्ञानपीठ असणाऱ्या विद्यापीठातील परीक्षा नियंत्रकच या गैरप्रकारात सामील असल्याने हे प्रकरण राज्यात गाजत आहे. यावर आमदार रोहित पवार यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. सोलापूर विद्यापीठामध्ये नेमकं काय घडलं हे बघावं लागेल. जेव्हा एखादी प्रश्‍नपत्रिका आउट होते, तेव्हा ही प्रश्‍नपत्रिका विकत घेणारे विद्यार्थी असतात श्रीमंत वर्गाचे.

मात्र सर्वसामान्य व कष्ट करण्याची ताकद आहे, असे गरीब विद्यार्थी मागे पडतात. विद्यापीठ हे ज्ञानपीठ असते, अन्‌ अशा ज्ञानपीठात असे गैरप्रकार घडत असेल तर त्याच्या खोलात जायची गरज आहे. असे गैरकृत्य युवकांना पटणारे नाही. संबंधित दोषींवर कडक कारवाई व्हावी, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

* औरंगाबादच्या नामांतरावर प्रतिक्रिया

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मी माझं व्यक्तिगत मत अनेक वेळा मांडलं आहे. एखाद्या शहराचं, गावाचं नाव बदलायचं असेल, तर त्या गावातील लोकांनाही विश्वासात घ्यावं. लोकशाही पद्धतीने किंवा अन्य माध्यमातून त्यांचं मत जाणून घेतलं, तर जो काय निकाल येईल, त्या निकालाला ताकद देण्याची जबाबदारी सरकारची असेल, असं रोहित पवार म्हणाले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #ग्राहकांचा #आवाज #ऊर्जामंत्र्यांपर्यंत #पोहोचवणार #रोहितपवारांनी #सोलापुरात #बॅटींग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, टीम इंडियाला क्वॉरन्टाईनच्या नियमातून सूट
Next Article अटक टाळण्यासाठी एकनाथ खडसेंचा आटापिटा, दिलासा देण्यास ईडीचा विरोध

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?