सोलापूर : शहरात अवैधरित्या मटका व्यवसाय चालविल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक सुनिल कामाठी (रा. न्यू पाच्छा पेठ), इस्माईल बाबू मुच्छाले (रा. मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशा मदार चौक), शंकर चंद्रकांत धोत्रे (रा. भगवान नगर झोपडपट्टी), नवनाथ भिमशा मंगासले (रा. मुस्लिम पाच्छा पेठ), हुसेन सैपनसाब शेख (रा. मुस्लिम पाच्छा पेठ) हे मुंबई- कल्याण नावाचा अवैध मटका जुगार चालवत आहेत. त्यामुळे त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश आज पोलिस आयुक्तालयाने काढले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अवैधरित्या मटका व्यवसायप्रकरणी पोलिसांनी शंभरहून अधिकजणांविरुध्द कारवाई केली आहे. नगरसेवक सुनिल दशरथ कामाठी (वय-४५ वर्षे, रा. न्यू पाच्छा पेठ, खड्डा ), इस्माईल बाबू मूच्छाले, (वय-३८ वर्षे, रा. ३२४, मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशा मदार चौक), शंकर चंद्रकांत धोत्रे ( वय-२३ वर्षे, रा. २१-सी, भगवान नगर झोपडपट्टी), नवनाथ मिमशा मंगासले (वय-३४ वर्षे, रा. मुस्लिम पाच्छा पेठ), हुसेन सैपनसाव शेख (वय-३० वर्षे, रा. १०३७७, मुस्लिम पाच्छा पेठ) या पाचजणांना सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.
दोन वर्षांसाठी हे आदेश असल्याचेही पोलिस आयुक्तालयाने त्यांच्या आदेशातून स्पष्ट केले आहे. पोलिस उपायुक्त परिमंडळ कार्यालयातील वाचक अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक एन. एस. कानडे यांनी आदेश काढले. मात्र, त्यावर ना त्यांची ना कोणत्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे.