Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणार ह्या अफवा, ऑलिम्पिक समिती अध्यक्षांचा खुलासा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणार ह्या अफवा, ऑलिम्पिक समिती अध्यक्षांचा खुलासा

Surajya Digital
Last updated: 2021/01/23 at 12:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होण्याच्या अफवांना पूर्णविराम दिला. यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यानची आयोजित ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करावी लागेल, असे वृत्त झळकले. यावर थॉमस म्हणाले, की ‘या अफवांवर विश्वास ठेवू नका. टोक्यो ऑलिम्पिक रद्द करण्याबाबत मी कोणत्याही वाहिनीला प्रतिक्रिया दिलेली नाही. माझ्या नावाचा उल्लेख करणाऱ्या वृत्तपत्रांविषयी तक्रार केली आहे’.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेली टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द होण्याच्या अफवांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी फेटाळून लावले आहे.

यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, परंतु जपानमधील कोरोनाची स्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने या वेळी ऑलिम्पिक रद्दच करावे लागेल, अशा आशयाचे वृत्त इंग्लंडमधील अग्रगण्य वृत्तपत्राने दिले. त्याशिवाय त्यांनी बातमीमध्ये एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे नाव वापरल्याने चाहत्यांमध्ये स्पर्धेच्या आयोजनावरून विविध चर्चाना सुरुवात झाली, परंतु बाख यांनी अशा बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे क्रीडाप्रेमींना आवाहन केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘‘टोक्यो ऑलिम्पिक रद्द करण्यात आले आहे, असे आमच्यापैकी कोणीही अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांत येणाऱ्या वृत्तांवर कोणीही विश्वास ठेवू नये. किंबहुना आम्ही ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून यासंबंधी शासनालाही आम्ही कल्पना दिली आहे,’’ असे बाख म्हणाले.

यासंबंधी टोक्योचे राज्यपाल युरिको कोइके म्हणाले की, ‘‘मी कोणत्याही प्रकारच्या वृत्तपत्राला तसेच वृत्तवाहिनीला टोक्यो ऑलिम्पिक रद्द करण्याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे माझ्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल मी त्या वृत्तपत्राविषयी तक्रार केली आहे.’’

You Might Also Like

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल

TAGGED: #टोक्यो #ऑलिम्पिकस्पर्धा #रद्दहोणार #ह्याअफवा, ऑलिम्पिक समिती अध्यक्षांचा खुलासा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धक्कादायक कबुली : ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडण्याचा कट
Next Article प्रतिक्षा संपली; आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध, 28 फेब्रुवारीला परीक्षा

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?