Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रतिक्षा संपली; आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध, 28 फेब्रुवारीला परीक्षा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

प्रतिक्षा संपली; आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध, 28 फेब्रुवारीला परीक्षा

Surajya Digital
Last updated: 2021/01/23 at 3:47 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी आहे. यासाठी 28 फेब्रुवारीला परीक्षा घेतली जाणार आहे. या पदभरतीचा तपशील www.mahapariksha.gov.in  www.arogya. | maharashtra. gov.in येथे पाहू शकता. दरम्यान, फेब्रुवारी 2019 साली जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले होते ते उमेदवार आता या नव्या जाहिरातीसाठीही पात्र ठरतील.

राज्याच्या आरोग्य विभागाने मेगाभरती जाहीर करत 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील.

या पदभरतीचा तपशील आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. रखडलेली ही जाहिरात प्रसिद्ध करुन राज्य सरकारने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा दिला असल्याचं सांगण्यात येतंय. सदर परीक्षा संपूर्ण राज्यात दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ ला एकाच दिवशी घेण्यात येईल. याबाबतचा तपशील वेळोवेळी वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरोग्य विभागाच्या या रखडलेल्या जाहिरातीचा एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर महाआघाडीचं सरकार आल्यानंतरची ही पहिलीच सर्वात मोठी जाहिरात आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रतिक्षेत असलेल्या अनेकांना दिलासा मिळाल्याचं दिसतं.

फेब्रुवारी 2019 मध्ये मागवले अर्ज
या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नसल्याचं सांगण्यात येतंय. फेब्रुवारी 2019 साली जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले होते ते उमेदवार आता या नव्या जाहिरातीसाठीही पात्र ठरतील.

राज्याच्या ग्रामविकास खात्याकडे आरोग्य विभागाची जी जवळपास दहा हजार पदे आहेत ती आणि आरोग्य खात्याची स्वत: ची सात हजार पदे अशी एकूण सतरा हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी आता 50 टक्के पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा
सदर प्रसिध्द झालेल्या जाहिरातीसाठी पुढच्या महिन्यात, फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येतील असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. 28 फेब्रुवारी 2021 रोजी एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एसईबीसी उमेदवार हे आर्थिक दुर्बल प्रवर्गाचा लाभ घेऊ शकतात असे सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

आरोग्य विभागाची भरतीची जाहिरात
स्वतंत्रपणे विभागाच्या सामान्य प्रशासन विभागाने आरोग्य सेवेतील ५० टक्के रिक्त पदांवरील पद भरती प्रक्रियेस मान्यता दिली असल्याने www.mahapariksha.gov.in व www.arogya. maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर नियुक्ती प्राधिकारीनिहाय रिक्त पदांचा तपशील प्रसिद्धसदर प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासन स्तरावर राखून ठेवण्यात पदभरतीबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पद भरतीसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदने मागविण्यात आली होती; परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल रह झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान, कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे. पद भरती तपशील विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा तातडीने घेणे आवश्यक असल्याने फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलवर जाहिरात प्रक्रियेद्वारे जे अर्ज मागविण्यात आले होते त्या अर्जानुसार पात्र असलेले उमेदवार या पद भरतीची परीक्षा देण्यास पात्र ठरतील.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #प्रतिक्षासंपली #आरोग्यविभागाची #जाहिरात #प्रसिद्ध #28फेब्रुवारीला #परीक्षा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणार ह्या अफवा, ऑलिम्पिक समिती अध्यक्षांचा खुलासा
Next Article बापरे ! 100, 10 आणि 5 रूपयांच्या नोटा बंद होण्याची शक्यता

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?