Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऊस गाळपात सोलापूर जिल्हा आघाडीवर, उता-यात कोल्हापूर सरस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

ऊस गाळपात सोलापूर जिल्हा आघाडीवर, उता-यात कोल्हापूर सरस

Surajya Digital
Last updated: 2021/01/24 at 3:36 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : राज्यात ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला आहे. गाळपात सोलापूर जिल्हा राज्यात आघाडीवर असून उताऱ्यात मात्र, कोल्हापूर सरस ठरले आहे. परतीच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर उजाडला. मागील अडीच महिन्यांत ऊस गाळपाने चांगला वेग घेतला आहे.

यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने साखर हंगाम सुरू होण्यासाठी काही जिल्ह्यांत अडचणी आल्या होत्या. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू झाले.

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. राज्यात गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांची संख्या सर्वाधिक आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवारपर्यत ९६ लाख ३७ हजार ४०२ मेट्रीक टन गाळप झाले आहे तर ८६ लाख २६ हजार ८९६ क्विंटल साखर तयार झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

साखर उतारा राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी ८.९५ टक्के इतका पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी ८६ लाख ८८ हजार २२९ मेट्रीक टन गाळप तर ९९ लाख ३८ हजार ७९४ क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उतारा राज्यात सर्वाधिक ११.४४ टक्के इतका पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात २१ साखर कारखान्यांनी ७० लाख ७ हजार तर पुणे जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी ७१ लाख ३० हजार ७२२ मेट्रीक टन गाळप केले आहे.

राज्यात सहकारी ९० तर ९२ खासगी असे १८२ साखर कारखाने सुरू असून ५ कोटी ५३ लाख ३८ हजार मेट्रीक टन इतके गाळप झाले आहे. ५४० लाख ७२ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

* उता-यात कोल्हापूर सरस

राज्याचा साखर उतारा ९.७७ टक्के इतका पडला आहे. राज्यात खासगी ९२ साखर कारखाने सुरू असून त्यापैकी सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाअंर्तगत सर्वाधिक २७ तर सोलापूर जिल्ह्यात १८ व उस्मानाबाद जिल्ह्यात ८ कारखान्यांचा समावेश आहे. साखर उतारा सोलापूर जिल्हा सर्वांत कमी ८.९५ टक्के , उस्मानाबाद ९.५ टक्के, पुणे ९.९ टक्के, सातारा जिल्ह्यात १०.४१ टक्के, सांगली ११.२२ टक्के तर कोल्हापूर ११.४४ टक्के याप्रमाणे आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #ऊसगाळपात #सोलापूर #जिल्हा #आघाडीवर #उता-यात #कोल्हापूर #सरस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नांदेडच्या कामेश्वर वाघमारेला पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार
Next Article …तर मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू; ठाकरे सरकारला इशारा

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?