लातूर : लातूरची सृष्टी जगताप ही मुलगी 26 जानेवारी रोजी 24 तास लावणी नृत्य सादर करून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नावं नोंदवायला निघाली आहे. लक्ष रेकॉर्ड बुकवर केंद्रित आहे. 26 जानेवारीला सकाळी ती सलग लावणी नृत्याचं रेकॉर्ड करण्यासाठी नृत्याला सुरुवात करणार आहे. 24 तास नृत्य सादर करण्याचा तिचा मनोदय आहे.
हल्लीची मुलं आपल्या कलागुणांना वाव देण्याची एकही संधी सोडत नाहीत. याचंच एक उत्तम उदाहरण लातूरमधून समोर आलं आहे. लातूरची सृष्टी जगताप ही आपल्या कलेला उच्च पातळीवर नेण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. आता तिने आपली कला थेट आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचा निश्चय केला आहे. यासाठी तिने जे करणार आहे, ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरची सृष्टी जगताप ही मुलगी 26 जानेवारी रोजी 24 तास लावणी नृत्य सादर करून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नावं नोंदवायला निघाली आहे. सृष्टी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे नृत्य प्रकार सादर करत असते. त्यामुळे आता आपली कला संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी ती सध्या प्रयत्न करत आहे. त्यामुळेच तिने 24 तास लावणी सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खरंतर, 24 तास सतत नाचणं म्हणजे शरीराची मोठी कसरत आहे. त्यात लावणीसारख्या मराठमोळ्या नृत्यप्रकारामध्ये खूप ताकद आणि मेहनतीची आवश्यकता आहे. पण सृष्टी आपल्या कलेतून या सगळ्यावर विजय मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. तिच्या या निर्णयाला आणि आत्मविश्वासाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सृष्टीला यश मिळो अशीच प्राथर्ना तिथे कुटुंबीय आणि गावातील मंडळी करत आहेत.
दरम्यान, सृष्टीने आतापर्यंत आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक पारितोषिकं पटकावली आहेत. विशेष म्हणजे देशात आणि देशाबाहेरदेखील सृष्टीने लावणीचे सादरीकरण केलेलं आहे. परंतु, तिला आपलं नाव आशिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवायचं आहे. सृष्टीच्या या निश्चयामुळे तिला सर्वच स्थरातून कौतुकाची थाप मिळत आहे.