भंडारा : शिवसेनेच्या नेत्यांनी सदबुद्धी सुचली असेल म्हणून ते आझाद मैदानात गेले नाहीत, अशी खोचक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भंडारा येथे केली. आझाद मैदानावर दिग्गज नेते उपस्थित असताना शिवसेना नेते नसल्याबाबत सवाल उपस्थित केला होता.
कृषी कायद्यांना विरोध तसेच इतर मागण्यांसाठी आज सोमवारी मुंबईतील आझाद मैदानात अनेक शेतकरी जमले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही नेतेही यावेळी हजर होते. मात्र, या सभेमध्ये शिवसेनेचे नेते उपस्थितन सल्यामुळे ‘शिवसेनेच्या नेत्यांनी सदबुद्धी सुचली असेल म्हणून ते आझाद मैदानात गेले नाहीत’, अशी खोचक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आझाद मैदानावरील सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे नेते उपस्थित नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हे खोचक वक्तव्य केले. ते भंडाऱ्यात बोलत होते.
कृषी कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार देऊ पाहत आहेत. मात्र, काही ढोंगी लोक या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आझाद मैदानात आलेला मोर्चा हा आदिवासींचा होता. मात्र, काहीजण त्या मोर्चाला शेतकरी मोर्चा सांगून दिशाभूल करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
* ठाकरे सरकार असंवेदनशील
भंडारा येथील रुग्णालायात झालेल्या दुर्घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला. त्यांच्या मातांचे अश्रू अजून सुकले नाहीत. तोच सरकारने सिव्हील सर्जनला वर्धा इथे रुजे करुन घेतलं आहे. हे सरकार असंवेदनशील आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच, सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असे म्हणत, सरकारवर ताशेरे ओढले.