Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वडनेर गावाजवळ काळी पिवळी टॅक्सीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

वडनेर गावाजवळ काळी पिवळी टॅक्सीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/01/25 at 9:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बुलडाणा : बुलडाण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा-वडनेर मार्गावरील वडी गावाजवळ मोठा अपघात झाला. वडनेरकडून नांदुराकडे वेगाने येणाऱ्या कंटेनरने वडनेर गावाजवळ काळी पिवळी टॅक्सिला धडक दिली. यात टॅक्सीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 9 जण गंभीर जखमी झाले. सुनिल सुभाष तायडे, अर्चना सुनिल तायडे पती-पत्नी, तर भगीरथाबाई विठ्ठल दळवी (वडनेर) अशी मृतांची नावे आहेत.

भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने काळी पिवळी टॅक्सीला धडकेत झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. बुलडाण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा-वडनेर मार्गावरील वडी गावाजवळ ही घटना घडली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त काळी-पिवळी प्रवाशी वाहतूक करणारी गाडी नांदुराकडून मलकापूरकडे जात होती. यावेळी वडनेरकडून नांदुराकडे भरधाव वेगाने येत असलेल्या कंटनेरने वडनेर गावाजवळ काळी पिवळी टॅक्सीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 9 जण गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातात काळी पिवळी टॅक्सीत बसलेले प्रवाशी सुनिल सुभाष तायडे, अर्चना सुनिल तायडे या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यासोबतच भगीरथाबाई विठ्ठल दळवी राहणार वडनेर याचाही मृत्यू झाला.

या घटनेची महिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर कंटेनर चालकाने पळ काढला. पण नागरिक आणि पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे नांदुरा शहरात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी कंटेनर चालक जीवन नलबतसिंग मालवी, मध्यप्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करत नांदुरा पोलिसांनी अटक केली आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #वडनेर #गावाजवळ #काळीपिवळीटॅक्सीचा #भीषणअपघात #तिघांचा #जागीचमृत्यू #9जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील बंधा-यांच्या दुरुस्तीसाठी 13 कोटींच्या निधीला मान्यता
Next Article शेतकरी कमी इतर लोकच आंदोलनात जास्त घुसवली, भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?