माढा : माढा शहरात विविध योजनेंतर्गत 1 कोटी 25 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा मिनलताई साठे यांच्या हस्ते बुधवारी झाले. यामध्ये माढ्याचे ग्रामदैवत माढेश्वरी देवीच्या मंदिर परिसराच्या विकासाचा समावेश आहे.
माढेश्वरी देवीच्या मंदिर परिसर विकासासाठी 44 लाख रूपये माढा नगरपंचायतीने मंजूर केले असल्याने भाविक भक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी भूमिपूजन करण्यात आलेल्या कामामध्ये माढा कुर्डूवाडी रस्ता ते बाळूमामा मंदिर ते साठे वस्ती रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण , माढा चिंचोली रस्त्यावरील काळेवस्ती ते कानडे वस्ती रस्ता तर सूतगिरणी येथील पाण्याच्या पाईपलाईन व विकासकामांचे भूमिपूजन दादासाहेब साठे यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपनगराध्यक्ष लक्ष्मीबाई राऊत, माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर, गंगाराम पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती कल्पना जगदाळे, नगरसेवक शहाजी साठे, प्रभाकर जाधव, नाना गाडे, आजिनाथ माळी, शिवाजी जगदाळे, कुमार चौरे, शिवाजी माने, हनुमंत राऊत, राजेंद्र भांगे उपस्थित होते.