नवी दिल्ली : इंडियन नॅशनल लोक दलाचे सरचिटणीस व ऐलनाबादचे आमदार अभयसिंह चौटाला यांनी आज(बुधवार) शेतकरी आंदोलनासा पाठिंबा जाहीर करत व केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवत हरियाणा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
या अघदोर अभयसिंह चौटाला यांनी विधानसभा अध्यक्षांना ईमेलद्वारे आमदारकीचा राजीनामा पाठवला होता. त्यावेळी त्यांनी, २६ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढला गेला नाही तर मी प्रत्यक्ष राजीनामा देणार असल्याचं सांगितलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभयसिंह चौटाला यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राजकीय वातावरण गरम झाले आहे. कारण, अभयसिंह यांचं म्हणणं आहे की, आणखी आमदार राजीनामा देण्यास मजबूर होतील. कारण, जे आमदार राजीनामा देणार नाहीत, त्यांना आपल्या मतदारसंघातील जनतेला सामोरं जाणं कठीण होईल.
तसेच, त्यांनी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच नाव घेता हे देखील बोलून दाखवलं की, जी लोकं देवीलाल यांच्या नावावर शेतकऱ्यांना भरकटवून सत्तेतर आले आहेत, त्यांना देखील आता उत्तर देणं अवघड होणार आहे.