यवतमाळ : यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी धक्कादायक प्रकार घडला. लहान मुलांना पोलिओऐवजी सॅनिटायजर पाजले गेले. त्यामुळे 12 मुलांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही मुलं वय वर्ष 0 ते 5 वयोगटातील आहेत.
भंडारा रुग्णालयातील अग्निकांडाची घटना ताजी असतानाच चिमुकल्यांच्या आरोग्याबाबत हलगर्जी बाळगणारी आणखी एक घटना राज्यात समोर आली आहे. पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्यामुळे यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांची प्रकृती बिघडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळे पाच वर्षांखालील चिमुरड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला. लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजले. 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वय वर्ष ते पाच वयोगटातील ही लहान मुलं आहेत.
सुरुवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरु झाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ घटनेची चौकशी करत आहेत.