Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोल्हापूर ते मुंबई प्रवास अवघ्या सहा तासांचा होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

कोल्हापूर ते मुंबई प्रवास अवघ्या सहा तासांचा होणार

Surajya Digital
Last updated: 2021/02/02 at 10:49 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरात फार काही पडलं नसलं, तरी पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईला यायचा प्रवास हा जलद होणार आहे. काल सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोसाठी साडे पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

देशातील बहुतांश रेल्वे मार्गांवरील रेल्वे या आगीमी काळात वीजेवर चालणार असून, यामुळे कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास कमी वेळेत करता येणार आहे. याचा फायदा मुंबई-पुणे-मिरज-कोल्हापूर यादरम्यान येणाऱ्या स्थानकांनादेखील होणार आहे.

कोल्हापूर रेल्वे कोकण रेल्वेला जोडण्यासाठी निधीचे काय? याविषयी तुर्त प्रश्न चिन्ह कायम आहे. मात्र, त्यासाठीही निधीची उपलब्धता होईल अशी अपेक्षा आहे, असे मत रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधीने व्यक्त केलंय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याबाबत रेल्वे प्रवासी निखिल शहा म्हणाले,कोल्हापूर – मिरज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालंय. चाचणी यशस्वी झालीय. तसेच मिरजेवरून पुणे पर्यंतचे विद्युत मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. अशा वेळी देशभरातील रेल्वे वीजेवर धावण्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अन्य मार्गावरही विद्युतमार्ग होतील, त्यामुळे येणार्‍या काळात कोल्हापूर-मिरज गाडी विजेवर धावू शकतील, असे घडल्यास कोल्हापूरातून मुंबईला अवघ्या 6 तासात पोहचता येणे शक्य होणार आहे.


पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण होऊन,त्याची चाचणीदेखील घेण्यात आली आहे. देशातील रेल्वेंच्या विद्युतीकरणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे देशभरातील बहुतांश रेल्वेचं विद्युतीकरण होण्याची शक्यता असल्यामुळे कोल्हापूर – मिरज रेल्वे वीजेवर धावतील. असे झाल्यास, कोल्हापूर ते मुंबई प्रवास अवघ्या सहा तासांचा होणार आहे. कोकण रल्वेशी कोल्हापूरला जोडण्याविषयी अद्याप तरी काही घोषणा करण्यात आलेली नाही.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #कोल्हापूर #मुंबईप्रवास #अवघ्यासहा #तासांचा #होणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नोकरदारांना मोदी सरकारचा झटका, वाचा सविस्तर, कसा बसणार फटका
Next Article शिवजयंतीनिमित्त जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सव, राहण्याची सोय सवलतीच्या दरात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?