Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नातेपुते -दहिगांवरोडवर भीषण अपघात, डिझेलने पेट घेतल्याने तीन तरूण जागीच ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

नातेपुते -दहिगांवरोडवर भीषण अपघात, डिझेलने पेट घेतल्याने तीन तरूण जागीच ठार

Surajya Digital
Last updated: 2021/02/02 at 9:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नातेपुते : नातेपुते ते वालचंद नगर रोडवर काल सोमवारी रात्री पावणेदहाच्या दरम्यान दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन तीन युवक जागीच ठार झाले. दहिगांव (ता. माळशिरस) पंडीत बाग येथे दोन मोटारसायकलचा समोरा-समोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण आपघातात तीनजण जागीच ठार झाले. यात मागील प्लॅस्टिकच्या कँडमधील डिझेलने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला.

दीपक विठ्ठल बुधावले ( वय२४), विशाल शशिकांत बुधावले (वय २५, दोघे रा.पिरळे ता.माळशिरस) आणि संग्राम रामदास जाधव (वय २७ रा.हागारेवाडी ता.इंदापूर ) असे मयत झालेल्या तिघांची नावे आहेत. दीपक आणि विशाला हे दोघे दुचाकीवरुन
शेतात नांगरण्यासाठी ट्रॅक्टरला एका प्लॅस्टिकच्या कँडमध्ये डिझेल घेऊन दहिगांवमार्गे पिरळे गावाकडे जात होते. विशाल शशिकांत बुधावले हा मोटारसायकल चालवित होता. व दीपक विठ्ठल बुधावले हा डिझेलचे कँड घेऊन पाठीमागे गाडीवर बसला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दोघे सोमवार रात्री ९:३० च्या दरम्यान नातेपुते ते दहिगांव जाणा-या रोडवरील पंडीत बाग जवळ पिरळे गावाकडे घरी जात असताना दहिगांवकडून येणा-या संग्राम रामदास जाधव (वय २७ रा.हागारेवाडी ता.इंदापूर ) हा दुचाकीवरुन दहिगांववरून येत असताना, समोरा-समोर जोराची धडक झाली.

या जोराच्या धडकेत प्लॅस्टिकच्या कँडमधील डिझेल मोटारसायकलवर पडून त्याचा भडका झाला. आग लागून त्यात ते गंभीररीत्या भाजून, डोकीस, हाता-पायास मार लागून तिघे जागीच मयत झाले. या अपघाताची माहिती नातेपुते पोलिसास समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावून अपघातातील मयत झालेल्या तिघांना नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
अपघाताची नातेपुते पोलिसात नोंद करण्यात आली असून, अपघाताचा पुढील तपास फौजदार प्रकाश इंगळे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #नातेपुतेदहिगांवरोडवर #भीषण #अपघात #डिझेलने #पेटघेतल्याने #तीनतरूण #जागीच #ठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवणा-या शार्जीलवर करा कठोर कारवाई
Next Article साऊथ कॉमेडी कलाकार पद्मश्री ब्रम्हानंद यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?