Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिथावणीखोर वक्तव्य, शरजील उस्मानीवर पुण्यात गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

चिथावणीखोर वक्तव्य, शरजील उस्मानीवर पुण्यात गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2021/02/03 at 9:17 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : एल्गार परिषदेत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शरजील उस्मानी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘आजचा हिंदू समाज सडलेला आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य शरजीलने केले होते. याप्रकरणी प्रदीप गावंडेंच्या तक्रारीनंतर शरजीलविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलिसात 153 अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या वक्तव्यामुळे भाजप खूप आक्रमक झाले आहे.

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शरजील उस्मानी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडण्याचं सत्र सुरु असतानाच सदर प्रकरणी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये शरजीलविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात 153 अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तिथं भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असणाऱ्या प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.

शरजील उस्मानीनं हिंदुंच्या भावना दुखावणारं आणि भारतीय संघराज्याच्या विरोधात घृणास्पद अशा आशयाची वक्तव्य केली होती. या दोन्ही वक्तव्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर स्वारगेट पोलीसांनी याचा रितसर एफआयआर नोंदवण्यात आल्याचं सांगत अजामीनपात्र गुन्हा नोंदवला गेल्याची माहिती दिली.

हिंदू समाजाबद्दल केलेले अपमानकारक, आक्षेपार्ह आणि गंभीर वक्तव्य पाहता आणि त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाईच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी शरजीलवरील कारवाईची मागणी करण्यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं. हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं होतं.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #चिथावणीखोर #वक्तव्य #शरजीलउस्मानीवर #पुण्यात #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article साऊथ कॉमेडी कलाकार पद्मश्री ब्रम्हानंद यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Next Article सोलापुरात अतिवृष्टीच्या महापुरात वाहून गेलेल्या माणसाचा चार महिन्यानंतर सापडा सांगाडा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?