नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून येत्या 6 फेब्रुवारी, शनिवारी चक्का जाम करण्याची घोषणा केली आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा राकेश टिकैत यांनी दिला. या आंदोलनाअंतर्गत रस्ते अडवण्याचा इशारा त्यांनी दिला. काळे कृषी कायदे मागे घेण्यासाठी संघटनेने सरकारला ऑक्टोबरपर्यंत डेटलाईन दिली आहे.
संयुक्त शेतकरी मोर्चाच्याच नेतृत्त्वात मागील दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, या तिन्ही कायद्यांच्या बाबतीत चर्चा करण्याची तयारी दाखवली असली तरीही सरकारनं हे कायदे रद्द करण्याला स्पष्ट नकार दिला आहे. आतापर्यंत 11 बैठकांची सत्र होऊनही या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला 70 दिवस झाले आहे. नविन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहे. आता भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. राकेश टिकैत यांनी ऑक्टोबरपर्यंत सरकारला वेळ दिला असून जर मागण्या मान्य झाल्या नाही देशभरात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
राकेश टिकैत म्हणाले, आम्ही सरकरला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. जर तोपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही देशात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल.