वर्धा : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अभिनेत्री कंगना राणावतला झापले. पॉपस्टार रिहानाचे ट्विट येताच भाजपच्या काही चमच्यांच्या प्रचंड पोटात दुखतेय. कंगणाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले. शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवणारे तुम्ही कोण? पुरावे सादर करा. आपण ज्या देशात राहतो, ज्या देशाचे अन्न खातो, ते या शेतकऱ्याने पिकवले आहे. याचे भान ठेवले तर स्वत:ला आपली लाज वाटेल’, असे रूपाली चाकणकर म्हणाल्या.
जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटनंतर चांगलाच गदारोळ माजला आहे. अभिनेत्री कंगना रनौतने तर रिहानाला प्रत्युत्तर देताना आंदोलक शेतकऱ्यांना अतिरेकी म्हटलं आहे. कंगनाच्या या टीकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी कंगणावर निशाणा साधला आहे.
“रिहानाचं ट्विट येताच भाजपच्या काही चमच्यांच्या प्रचंड पोटात दुखतंय. कंगणाने याबाबत ट्विट करत हे शेतकरी दहशतवादी आहे, असं म्हटलंय. मला या अशा लोकांना विचारायचं आहे. शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवणारे तुम्ही कोण? तुमच्याकडे याचे पुरावे आहेत काय? पुरावे असतील तर ते सादर करा. किमान आपण ज्या देशात राहतो, ज्या देशाचं अन्न खातो, ते अन्न या अन्नदात्याने पिकवलं आहे. या शेतकऱ्याने पिकवलं आहे. याचं भान ठेवलं तर आपल्याला स्वतःला आपली लाज वाटेल”, अशा शब्दात चाकणकर यांनी टीका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“रिहाना यांना या देशाच्या शेतकऱ्यांची काळजी वाटते. त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यावेळेस कंगना अशा पद्धतीने ट्विट करत दहशतवादी ठरवते. तिची ही संकुचित वृत्ती अत्यंत किळसवाणी आहे. भाजप विरोधी बोललेलं प्रत्येक वाक्य तिला दहशतवादी का वाटते? हेच काही समजत नाही. अशा पद्धतीचा वक्तव्य करत असताना खरा दहशतवादी कोण आहे? याचा अभ्यास कंगणाने करावा”, अशा सल्ला रुपाली चाकणकर यांनी दिला.
अभिनेत्री कंगना रणौतने रिहानाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोणीही याबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत. जेणेकरुन चीनसारखे देश आपल्या देशाचा ताबा घेतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत बस, मूर्ख. आम्ही तुझ्यासारखे मूर्ख नाही आहोत जो आमचा देश विकू’, असं कंगनाने म्हटलं आहे.
* रिहाना काय म्हणाली होती?
जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने म्हटलं आहे. इतकंच नाही तर रिहानाने ट्विट करताना ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. रिहानाने ट्विट केलेल्या बातमीमध्ये दिल्लीमध्ये आंदोलनावेळी परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याची बातमी देण्यात आली आहे.
* ‘आंदोलनात शेतकरी नसून दहशतवादी आहेत, ज्यांना भारताचे विभाजन…’
पॉपस्टार सिंगर रिहाना हिने कृषी कायद्याविरोधातील आंदोलकांना पाठिंबा देणारे ट्विट केले. यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने तिला प्रत्युत्तर दिले. ‘या आंदोलनात शेतकरी नसून दहशतवादी आहेत; जे भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत’, असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले. पण, या आंदोलनात दहशतवादी असल्याचे सिध्द झालेले नाही. त्यामुळे आंदोलक शेतक-यांचा दहशतवादी उल्लेख केल्याने कंगना पुन्हा संकटात सापडली आहे.