यवतमाळ : अभिनेत्री कंगना रनावत हिने पुन्हा एकदा शेतकर्यांना आतंकवादी संबोधल्यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आज गुरुवारी पांढरकवडा येथे शेतकरी विधवांनी कंगना रनौतचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला. यापुढे सर्व शेतकरी कंगना रनावतच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणाही शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी विधवा दिल्ली येथील प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात तसेच शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आता, मात्र या आंदोलनात सहभागी झालेले सर्वच शेतकरी आतंकवादी असल्याचे वक्तव्य कंगना रानावत हिने केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा शेतकर्यांचा अपमान असल्यामुळे आज पांढरकवडा येथे कंगनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कंगनाचा पुतळा जाळून तिचा निषेध केला.
याप्रसंगी शेतकरी नेते किशोर तिवारी, समाजसेवक स्मिता तिवारी, शेतकरी विधवा भारती पवार, पौर्णिमा कोपुलवार, कविता सिद्म, लक्ष्मी गिरीवार, राम ठमके, वंदना मोहर्ले, रेखा गुरनाळे, अपर्णा मलिकर, योगिता चौधरी, माजी नगरपालिका अध्यक्ष अनिल तिवारी, अंकित नैताम, सुनील राऊत, सुरेश तलमले, नीलेश जयस्वाल, मनोज चव्हाण, संदीप जाजुलवार, चंदन जैनकर, प्रदीप कोसरे, बबलू धुर्वे, आशुतोष अंबाडे उपस्थित होते.