न्यूयॉर्क : जगभरात असे अनेक अवलिया आहेत, ज्यांना इतरांपेक्षा काही तरी वेगळं करायचं असतं. त्याचे परिणाम काय होणार याचा विचारही न करता ते एखादी गोष्ट करून मोकळे होतात. पण जेव्हा त्याचे दृष्परिणाम लक्षात येतात तेव्हा फार उशीर झालेला असतो. असंच काहीसं न्यूयॉर्कमध्ये एका रॅपरसोबत घडलं आहे.
लील वझ वर्ट असे त्या रॅपरचे नाव आहे. त्याने १० ते ११ कॅरेटचा रोझ क्वार्ट (गुलाबी रंगाचा खडा) कपाळावर नेहमीसाठी कोरला आहे. २६ वर्षीय रॅपरने यासाठी साधारणपणे २४ मिलियन डॉलर म्हणजे साधारणपणे १ अब्ज ७४ कोटी रुपये गुंतवले. तिसऱ्या डोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या या खड्याचा आता फार त्रास होत आहे. रॅपरने ३ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा खडा स्पष्टपणे दिसतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रॅपरने काही दिवसांपूर्वी हा खडा विकत घेतला. विशेष म्हणजे २०१७ पासून तो यासाठी बचत करत होता. आता एवढ्या महागाचा खडा विकत घेतलाच तर तो अशा पद्धतीने वापरावा ज्याने तो सगळ्यांनाच दिसेल. ३० जानेवारीला त्याने यासंबंधी ट्वीटही केलं होतं. तेव्हापासून त्याचे चाहते खड्याबद्दल अधिक माहिती देण्याची विनंती त्याला करत होते.
चाहत्यांनी हा फोटो पाहून तू याची आंगठी का केली नाहीस असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना रॅपर म्हणाला की, ‘एवढ्या महाग खड्याची अंगठी केली असती आणि ती अंगठी मी हरवली असती तर तुम्ही माझ्यावर अजून जास्त हसला असता.. असं असलं तरी या खड्याचा विमा काढला आहे.’ पण जसा लिलने आपला फोटो शेअर केला. ट्विटरवर अनेक मीम्स व्हायरल झाले. अनेकांनी त्याला अॅवेन्जरमधला थ्रोनही म्हटलंय.