Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं’, शिवसेनेशी युतीचा प्रश्नच येत नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

‘अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं’, शिवसेनेशी युतीचा प्रश्नच येत नाही

Surajya Digital
Last updated: 2021/02/06 at 4:17 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातल्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी ते महाराष्ट्रात येतील. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. अमित शहा यांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. तसंच शिवसेनेशी युतीचा प्रश्नच येत नाही, अशी पक्षातली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्गातल्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार आहेत. त्याआधी भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा नारायण राणेंनी बोलून दाखवली. शिवसेनेशी युतीचा प्रश्नच येत नाही, अशी पक्षातली भूमिका आहे. विधानसभा अध्यक्षपदाबाबत भाजपने बाजी मारली पाहिजे, असं मत राणेंनी व्यक्त केलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘पुढच्या निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर भाजपचा असेल, गुजराती समाज मोदी आणि शाह यांना सोडून बिनबुडाच्या लोकांकडे जाणार नाही. आम्ही फोडाफोडीत पीएचडी केली आहे. तसंच युतीबाबत मनसेनं ठरवावं, शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजप समर्थ आहे,’ अशी भूमिका नारायण राणेंनी मांडली.

शेतकऱ्यांना समोर करून आंदोलन हिंसक केलं जात आहे. अशा आंदोलनातून शेतकऱ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मग आंदोलन का? याच्या मागे काँग्रेस आणि बाहेरचे लोक आहेत. सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह आहे, असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं.

* उद्धव ठाकरे सरकार नीट चालवतात का?

पेट्रोल आणि डिझेलचे दर काही अमित शाह, नरेंद्र मोदी ठरवत नाही. शिवसेनेची भूमिका धरसोडीची आहे. राज्यात भाजपच एक नंबरचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे सरकार नीट चालवतात का?’ असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

‘ज्या दिवशी ठाकरेंनी आघाडी सरकार स्थापन केलं, त्यादिवशीच त्यांनी हिंदुत्व सोडलं. त्यांनी हिंदुत्वासाठी काहीच काम केलं नाही. शिवसेना धरसोड आहे, एकही विचार नाही. बाळासाहेबांनंतर एकही माणूस नाही, ज्याने बोललेलं पूर्ण केलं. एक ना धड भाराभर चिंद्या अशी अवस्था शिवसेनेची आहे,’ अशी टीका नारायण राणेंनी केली.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Thestategovernment #shouldfollow #thefootsteps #ofAmitShah, #अमितशहांच्या #पायगुणाने #राज्यसरकार #जावं #शिवसेनेशी #युतीचा #प्रश्नचयेतनाही
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘भाकरी तिजोरीत बंद होऊ नये म्हणून आंदोलन, ऑक्टोबर पर्यंत येथेच आहोत’ देशभरात चक्का जाम
Next Article ‘परश्या’ पुन्हा चाहत्यांच्या भेटीला, या वेब सीरिजमधून झळकणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?