Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मनशांतीसाठी धडाकेबाज तुकाराम मुंढे आर्ट ऑफ लिव्हिंग’ मध्ये ?  पुन्हा चर्चेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मनशांतीसाठी धडाकेबाज तुकाराम मुंढे आर्ट ऑफ लिव्हिंग’ मध्ये ?  पुन्हा चर्चेत

Surajya Digital
Last updated: 2021/02/08 at 10:01 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बंगळुरु : मन शांतीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत आहेत ते त्यांच्याच एका ट्विटमुळे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 3 फेब्रुवारीला तुकाराम मुंढे यांनी रात्री 7 वाजून 11  मिनिटाला ट्विट केलं आहे. यात ते बंगळुरुच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेंटरमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे ट्विटसोबत त्यांनी फोटोही टाकला ज्यात ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्यासोबत दिसत आहेत. फोटोत रविशंकर बसलेले आहेत तर तुकाराम मुंढे उभे आहेत. ट्विटमध्ये मुंढे म्हणतात, जय गुरुदेव, खुपच छान संवाद. आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर, बंगळुरु.

धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेले तुकाराम मुंढे सध्या काय करतायत? हा प्रश्नही पडणं स्वाभाविक आहे. कारण गेल्या काही दिवसात तुकाराम मुंढे यांची कुठलीच बातमी नाही. नागपूर पालिका आयुक्तपदावरुन  त्यांची ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बदली झाली. त्यानंतर ते फारसे चर्चेत नाहीत. पण आता सध्या ते काय करतायत याची माहिती त्यांनी स्वत:च दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नेमका संवाद कशावर झाला असेल? आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेंटरमध्ये असाल तर नक्कीच राजकीय घडामोडींवर किंवा ऑफिसच्या कामाबद्दल संवाद झाला असण्याची शक्यता कमीच. रोजच्या कामातले ताण तणाव आणि ते दूर कसे करावेत यावर तुकाराम मुंढे आणि अध्यात्मिक गुरु रविशंकर यांच्यात चर्चा झाली असावी. फोटोतही जे दिसतंय त्यानुसार तुकाराम मुंढे मनोगत व्यक्त करायला उभे टाकल्यासारखे दिसतायत आणि रविशंकर यांच्या चेहऱ्यावरही तशाच स्वरुपाचे भाव आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ह्या सेंटरमध्ये फक्त तुकाराम मुंढेच होते की आणखी इतर अधिकारी हे मात्र कळू शकलेलं नाही. ट्विट किंवा फोटोमधूनही ते फार दिसत नाही.

तुकाराम मुंढेंची प्रेरणा कोण? IAS अधिकारी असलेले मुंढे यांना कशातून प्रेरणा मिळते? ते नेमकं कुणाकडून ऊर्जा घेतात? असे अनेक प्रश्न त्यांनाही विचारले गेलेत आणि त्याचं उत्तरही त्यांनी मनमोकळेपणानं दिलं आहे. 3 फेब्रुवारीला त्यांनी दुसरं एक ट्विट केलंय त्यात त्यांनी कोण शिकवतं आणि कुणाकडून प्रेरणा मिळते हे स्पष्ट केलंय. ट्विटमध्ये मुंढे म्हणतात, तुमच्या आयुष्यावर ज्याचा सर्वाधिक परिणाम असतो असा व्यक्ती खुद्ध तुम्हीच असता. आपल्याला जे शिकवलं जातं त्यातून आपण बेस्ट शिकत नाही तर आपण काय करतो त्यातून बेस्ट शिकतो.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #TukaramMundhe #inBengaluru #withSriSriRavishankar, #मनशांतीसाठी  #धडाकेबाज #तुकाराममुंढे #आर्टऑफलिव्हिंगमध्ये #पुन्हाचर्चेत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इंधनावरील कर कमी करण्याचा विचार, मात्र केंद्र आणि राज्य सरकाराच्या सहमतीची गरज
Next Article मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रत्येक गावात बुधवारी उपोषणाला बसण्याचे आवाहन, सोलापुरातही झाली बैठक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?