Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवार देशातील पहिले नेते; चारही सभागृहात काम करण्याची संधी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

शरद पवार देशातील पहिले नेते; चारही सभागृहात काम करण्याची संधी

Surajya Digital
Last updated: 2020/07/23 at 7:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच राज्यसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. ही त्यांची कोणत्याही सभागृहाचे सदस्य होताना घेतलेली सोळावी शपथ होती. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे चारही सभागृहात काम करणारे शरद पवार हे पहिलेच नेते आहेत. देशातील ते पहिले नेते ठरले आहेत ज्यांनी चार ही सभागृहात सदस्य म्हणून काम केलं आहे, करत आहेत.

राजकारणासारख्या क्षेत्रात एखादी व्यक्ती तितकीच वर्ष टिकू शकते जितकी वर्ष त्या व्यक्तीला जनमानसात स्थान आहे. लोकशाहीत लोकांनी दिलेल्याच मतांच्या जोरावर कोणताही व्यक्ती विधी मंडळाच्या किंवा संसदेच्या सभागृहात पाऊल टाकू शकते. महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या राजकारणातही शरद पवार हे एकमेव नाव असं आहे ज्यांनी राज्यातील विधानसभा, विधानपरिषद या सभागृहात आणि संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहाचे सदस्य म्हणून काम केलं आहे.

शरद पवार यांनी नुकतीच राज्यसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. ही त्यांची कोणत्याही सभागृहाचे सदस्य होताना घेतलेली सोळावी शपथ होती. शरद पवार यांनी सगळ्यात आधी सुरुवात केली ती महाराष्ट्राचे विधानसभेतील सदस्य म्हणून. 1967 साली ते पहिल्यांदा बारामतीमधून आमदार म्हणून निवडून आले. ती त्यांची पहिली शपथ होती.

त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. वर्ष 1972, 1978, 1980 या तिन्ही वेळी बारामतीमधून ते आमदार म्हणून निवडून आले. 1978 रोजी शरद पवार पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1984 मध्ये पहिल्यांदा ते बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले तेव्हा पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली. ही पहिल्यांदा लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. 1985 मध्ये पुन्हा शरद पवार विधानसभेवर आले. 1990 मध्ये आमदार म्हणून ही सातव्यांदा शपथ घेतली होती. 1991 मध्य पुन्हा एकदा शरद पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. या काळात त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून काम केले.

मुंबईत झालेल्या दंगलीनंतर त्यांना दिल्लीतून महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा मिळाली, तेव्हा 6 मार्च 1993 रोजी शरद पवार यांनी विधानपरिषदेवर सदस्य म्हणून शपथ घेतली. 1996 पासून शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे 1996 1998, 1999, 2004 चारवेळा बारामतीमधून लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. 2009 मध्ये सुप्रिया सुळे बारामतीमधून पहिल्यांदा खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला आणि लेकीसाठी बारामती मतदारसंघ शरद पवार यांनी सोडला. पण माढामधून निवडणूक लढवली आणि सातव्यांदा लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली.

केंद्रीय कृषी मंत्री असतानाच आणि 2014 लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार यांनी यापुढे निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे 2014 ला पहिल्यांदा शरद पवार यांनी राज्यसभा सदस्य म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. त्यानंतर काल दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. अशा प्रकारे शरद पवार यांनी सोळा वेळा विविध सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली.

You Might Also Like

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

TAGGED: #शरदपवार #देशात #एकमेवनेता #चारसभागृहात #लोकसभा #राज्यसभा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निषेध, संताप व्यक्त होत असल्याने अखेर उपराष्ट्रपतींनी केले स्पष्टीकरण
Next Article सोलापूर शहरात राञी बारापर्यंत चार मृत्यू तर नव्याने 126 कोरोना रुग्ण

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?