टेंभुर्णी : मोडनिंब (ता.माढा )अरण दरम्यान सिमेंटच्या बल्करवर दगडफेक करीत काचा फोडून चालकासह दोघांना कोयत्याचा धाक दाखवून १ लाख १९ हजार रुपये लुटन नेल्याची घटना शनिवारी पहाटे ३.३० वाजता घडली.
यात संशयित आरोपी सागर सुनिल मसूरकर व सौरभ माळी ( दोघे रा.अंजनगाव ( खि ) ता.माढा जि. सोलापूर ) यांच्यासह नऊजणांविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की रविंद्र दत्तू परबत (मूळ गाव तडवळे ता.माढा हल्ली रा.इंदापूर जि.पूणे) हे आपला बल्कर टँकर (क्रमांक एमएच १२ क्यु जी ७१७४ ) घेऊन चालक हैदर अमीन पठान (५५ रा. अंजनगाव उमाटे ता. माढा) तेलंगणा राज्यातील गुंटुर येथून ट्रकमध्ये सिमेंट भरण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी ट्रकचे टायर स्वस्त मिळतात म्हणून परबत यांनी बँकेतून १ लाख १० हजार व जवळील १० हजार असे १ लाखा २० हजार रूपये घेऊन गेले होते. त्यातील दोन हजार खर्च झाले. मात्र ट्रक टायर स्वस्त न भेटल्याने ते सिमेंट भरून माघारी निघाले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुंटुर येथून सिमेंट भरून मुंबईकडे जात असताना शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास मोडनिंब येथील उड्डान पुलावर आले असता तीन मोटारसायकलवर तोंडाला रुमाल बांधून नऊ जणांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडी सोलापूर-पूणे राष्ट्रीय महामार्गावर मोडनिंब ते अरण दरम्यानच्या चडावर आल्यावर मोटारसायकलवर आलेल्यां संशयित आरोपींनी गाडीवर दगड मारले. यामध्ये गाडीची डाव्याबाजूची काच फुटली. दोघेजणा घाबरून गेले. सागर सुनिल मसूरकर व सौरभ माळी हे दोघे हातात कोयते घेऊन गाडीच्या केबिनमध्ये चडले. रविंद्र परबत यांचे गळ्याला कोयता लावून जवळ असलेले पैसे दे म्हणत दमबाजी केली.
यावर परबत यांनी सगळे पैसे देतो पण मारु नका, अशी विनंती केली. यावेळी सिटाखाली ठेवलेल्या ड्राव्हरमधील १ लाख १९ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पैसे घेऊन खाली उतरले व दोघांचे तोंडानी तोंडाचा रूमाल काढला मी दोघांना ओळखले यामध्ये माझे गळ्याला कोयता लावणारा सागर सुनिल मसूरकर व सौरभ माळी या दोघांना ओळखले बाकीची तोंडाला रुमाल बांधलेले सात लोक तीन मोटारसायकलवर ट्रिपलसीट मोडनिंबच्या दिशेने निघून गेले, अशी फिर्यादीत म्हटले आहे.
मसूरकर व माळी व इतर अज्ञात सात अशा नऊ जणांविरुद्ध १ लाख १८ हजार व ५ हजार रूपये किंमतीची काच फोडून नुकसान केले म्हणून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
