मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नाव आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार राठोड यांनी कालच आपला राजीनामा मातोश्रीवर पाठवून दिला आहे.
पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर विरोधकांनी आघाडी सरकारला आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना घेरले होते. त्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत आणि चित्रा वाघ यांनी या प्रकारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती . तसेच राठोड यांना तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य केले होते.
दरम्यान, आज मंगळवारी मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हेदेखील बघावे लागेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन, कडक कारवाई केली. उद्धव ठाकरे यांनी कारवाई केलेले आघाडी सरकारमधील राठोड हे पहिलेच मंत्री ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे संजय राठोड हे महाविकास आघाडीचे मंत्री असले तरी ते शिवसेनेचे नेते आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्याची मागणी केली आहे.
संजय राठोड गुरुवारी 18 तारखेला आपली बाजू मांडतील, असं पोहरादेवीचे महंत यांनी सांगितलं आहे. संजय राठोड यांना समर्थन देण्यासाठी यवतमाळमध्ये हालचालीही सुरू झाल्या आहेत.
वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
“एकाने ‘मारल्यासारख करायचं, दुसऱ्याने रडल्यासारख करायचं’ असं होता कामा नये. तसंच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी,” अशीसुद्धा त्यांनी मागणी केली आहे.