सोलापूर : सोलापूर शहरापासून अवघ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावर म्हणजे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे गावात महाविद्यालयीन युवकांनी एकत्रित येऊन अर्ध्या एकरात कडब्यापासून शिवरायांची प्रतिमा साकारली आहे. या आगळ्या वेगळ्या प्रतिमेला पाहण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यासाठी प्रतिक तांदळे, अभिजय गायकवाड, विवेक उरडे, सुमित काटाळे, गौरव शिंदे, अभिषेक बोरकर, प्रदीप शिंगाडे, समर्थ जोशी, बालाजी आंबुरे या युवकांनी मोठी मदत केली आहे.
दरम्यान, यापुर्वीही प्रतिक तांदळे मित्र परिवाराने गणेशोत्सवात गणपतीची भव्यदिव्य प्रतिमा साकारली होती. या शिवरायांची सुंदर प्रतिमा पाहून शहर व जिल्ह्यातील शिवभक्त पाहण्यासाठी गर्दी करीत असल्याचे सांगण्यात आले.
* लागला दहा दिवसांचा कालावधी
सिंहगड महाविद्यालयातील प्रतिक तांदळे या विद्यार्थ्यांने ही प्रतिमा अर्ध्या एकर शेतामध्ये केली आहे. ही प्रतिमा पूर्णपणे पर्यावरण कुलीत आहे. ज्वारीचे रोप वाळवून त्यापासून ही प्रतिमा बनवली आहे. ह्या प्रतिमेला तयार करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागला. ह्या प्रतिमेची लांबी १५० फूट व रुंदी ७५ फूट एवढी आहे.