सांगली : गोपीचंद पडळकर जो पर्यंत आमदार होणार नाही तो पर्यंत चप्पल न घालण्याचा प्रण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा धनगर नेते आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्कार केला आहे. यावेळी स्टेजवरून बोलताना पडळकरांना अश्रू अनावर झाले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच पडळकरांनी त्या तिन्ही कार्यकर्त्यांचा चांदीची चप्पल आणि नवी-कोरी दुचाकी देऊन त्यांचा सत्कार केला होता. गोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा करत दत्तात्रय कटरे यांनी २००६ पासून पायात चप्पल घातली नव्हती. तर नारायण पुजारी यांनी २००९ पासून चपला घातल्या नव्हत्या. त्यांचा गोपीचंद पडळकर यांनी सत्कार केला.
दुसरीकडे, गोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत, तोपर्यंत केस-दाढीचे पैसे घेणार नाही, असं २००९ मध्ये म्हणणाऱ्या जालिंदर क्षीरसागर यांच्या वारसांना पॅशन गाडी प्रदान करुन सन्मान करण्यात आला. गोपीचंद पडळकर यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.