सोलापूर : सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई सोसायटीचे थकीत कर्जदार सभासद सहा मुख्याध्यापक व १० शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यात आली आहे. कर्ज हप्त्याचे धनादेश बाउन्स झाल्याने ही कारवाई झाली. उर्वरित ३२ अनियमित, कर्जदार सभासदांचे कर्ज हप्त्याचे धनादेश न वटल्याने फौजदारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वसुली अधिकारी विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंढरपूर व सोलापूर शाखेतून चार हजार पेक्षा जास्त सभासद असून, वैयक्तिक पगार तारण कर्ज २५ लाख रुपयांपर्यंत व तातडीने दोन लाख रुपये कर्ज दिले जाते. सभासदांना १०.५ टक्के व्याजदराने कर्ज विचारून करण्यात येते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कलम ४९ अंतर्गत पगार बिलातून कर्ज हप्ता कपात करण्याचे मुख्याध्यापकांनी हमीपत्र दिले आहे. मात्र, काही मुख्याध्यापक आणि वेळेवर कर्ज हप्ता कपात न केल्याने मुख्याध्यापकांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. कर्ज थकबाकी पूर्ण वसूल होईपर्यंत कायदेशीर कारवाई चालूच राहणार आहे. कर्जवाटप केलेला पैसा ३८ हजार सभासदांच्या कष्टाचा व घामाचा असून तो वसूल होणे आवश्यक आहे. कर्जाचे दोनपेक्षा जास्त हप्ते थकीत असल्यास फौजदारी कारवाई अटळ असल्याचे सांगितले.