ठाणे : ‘अल्लाह को मालूम था 2011 में कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में 2019 में कब्रस्तान बना’, असे वक्तव्य मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वक्तव्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असून मुस्लिम समाजाला खुश करण्याचे राजकारण आव्हाड करत असतात, असे विरोधकांनी म्हटले आहे.
अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना, असं वादग्रस्त विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुंब्रा येथील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वादग्रस्त आवाहन केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अल्लाह को मालूम था 2011 में कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में 2019 में कब्रस्तान बना, असं वादग्रस्त वक्तव्य आव्हाड यांनी केलं आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आव्हाड हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. मात्र, आता कोरोनाच्या संकटातील आपले यश – अपयश झाकण्यासाठी त्यांनी थेट अल्लाचाच आधार घेतल्याची टीका होऊ लागली आहे.
कोरोनाचे संकट येणार हे अल्लाहला 2011 सालीच दिसले म्हणून 2019 ला कब्रस्तान बनले, असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान करून मुस्लिम समाजाला खुश करण्याचे राजकारण आव्हाड यांनी केल्याचे व्हिडिओवरून दिसत आहे. आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर आव्हाड यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. तुम्ही म्हणता जे काही होतं ते अल्लाच करतो. हे कब्रस्तानही अल्लानेच बनवले आहे, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.