सोलापूर : सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील पहिला पर्यावरणपूरक सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. कुर्डुवाडीजवळ चिंक हिल येथे रेल्वेच्या ८० एकर जमिनीवर येत्या काही महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वाला जाईल. त्यातून १२ ते १६ मेगावॅट वीज निर्मिती होईल. त्याचा वापर सोलापूर रेल्वे विभागातील कार्यालयांसाठी करण्याचे नियोजन आहे.
महाराष्ट्रातील बहुतेक शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती केली आहे. ज्या कार्यालयात वीज निर्मिती होते त्याचा वापर कार्यालयीन वापरासाठी केला जातो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रेल्वे स्टेशनवरही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. सोलापुरात दोन प्रस्ताव इलेक्ट्रिकल विभागाने गेल्या वर्षी पाठवले आहेत.
मात्र त्यातील (लँड बेस्ड) जमिनीवरील प्रकल्पासाठी मान्यता दिली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. हे काम रेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कॉर्पोरेशन यांच्या वतीने पाहिले जाणार आहे.