नवी दिल्ली : इंटरनेट युजर्सच्या अकाउंटमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे लीक समोर आले आहे. जगभरातील जवळपास 300 कोटी आयडी पासवर्ड लीक झाले आहेत. यात Gmail शिवाय Netflix आणि Linkedin प्रोफाइलचा समावेश आहे. तुम्ही https://cybernews.com/personal-data-leak-check/ वर क्लिक करा. या साईटवर तुम्ही तुमचे ईमेल आयडी टाकून लीकची माहिती चेक करू शकता.
सध्या जगभरात डेटा लीक एक मोठी समस्या बनली आहे. आता असा दावा केला जात आहे की, इंटरनेट युजर्संच्या अकाउंट्समध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे लीक समोर आले आहे. जगभरातील जवळपास ३०० कोटी आयडी पासवर्ड लीक झाले आहे. यात Gmail शिवाय Netflix आणि Linkedin प्रोफाइलचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
The Sun च्या एका रिपोर्टनुसार, यावेळी जगातील सर्वात मोठे लीक झाले आहे. जवळपास ३०० कोटी लोकांचे पासवर्ड डेटा लीक झाला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा सिक्योरिटी लीक मानला जात आहे.
Gmail, Netflix आणि Linkedin च्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड सुद्धा लीक झाले आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार, पहिल्यांदा डेटा लीक मध्ये लोकांचा Netflix आणि Linkedin च्या प्रोफाइलचा यात समावेश आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, जवळपास १५०० कोटी अकाउटमध्ये ब्रीज झाले आहे. तर जवळपास ३०० कोटी लोकांचे ईमेल आयडी आणि पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत. यावेळी जवळपास ११.७ कोटी लोकांचे Linkedin आणि Netflix अकाउंट्स हॅक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युजर्सचा डेटाला इंटरनेट वर अपलोड करण्यात आले आहे. हॅकर्स या डेटाचा वापर दुसऱ्या अकाउंटला हॅक करण्यासाठी करू शकतात.