Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2020/07/24 at 1:45 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पुणे : वकिली आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेले राज्यातील ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड (वय 77) यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात मुलगा ऍड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवासह विविध वकिल संघटनांचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या कमिटीवर देखील त्यांचा समावेश होता. वकिलीची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी अनेक तरुण वकील घडवले आहेत. बदलते कायदे व वकिली आणि न्यायालयीन व्यवस्थेबाबत त्यांनी राज्यभरात शेकडो व्याख्याने दिली आहेत. भास्करराव आव्हाड यांचे बंधू सुधाकरराव आव्हाड देखील ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून परिचित आहेत.

* विधिज्ञ आव्हाड यांचा अल्प परिचय

विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी लॉकडाऊनच्या काळात देखील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केले. विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळीअंक यातून लेखन करून समाजात कायद्याविषयी जनजागृती व्हावे यासाठी त्यांनी लिहिलेले लेख वाचनीय आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका खेड्यात जन्म झालेल्या आव्हाड यांना महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थानी अनेक पुरस्काराने गौरवले होते. त्यांच्या निधनामुळे वकिली क्षेत्रातील माहितीचा भांडार आणि चांगले मार्गदर्शक हरपल्याची भावना वकील व्यक्त करत आहेत.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #ज्येष्ठविधिज्ञ #भास्कररावआव्हाड #वकिली #लेखन #सामाजिकक्षेञ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दोन तलवारीसह तरुणास अटक, शिराळ्यातील रेड बसस्थानकावरील घटना
Next Article क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी; आयपीएलच्या तारखा ठरल्या

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?