जळगाव : तालुक्यातील ग्राम झाडेगाव येथे एकाच दिवशी तब्बल १५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. २ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झाडेगाव येथे पारायण सप्ताहाचा कार्यक्रम झाला. तिथूनच कोरोनाची सुरुवात गावामध्ये झाली.
आज मंगळवारी सकाळपासूनच गावामध्ये आरोग्य पथक, पोलीस, महसूल यंत्रणा तैनात झाल्या असून आरोग्य विभागाने गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू केले. प्रशासनामार्फत गाव कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
२ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झाडेगाव येथे पारायण सप्ताहाचा कार्यक्रम झाला. तिथूनच कोरोनाची सुरुवात गावामध्ये झाली. सर्वप्रथम या ठिकाणच्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यानंतर गावांमध्ये सर्दी आणि तापाची भयंकर साथ आली. सर्व लोकांनी खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली. २१३ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यांचे अहवाल काल सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यातील १४१ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले, तर १४ जण अगोदरचे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या छोट्याशा गावात आता कोरोना रुग्णांची संख्या १५५ झाली आहे.
जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाडेगावसह तालुक्याचा आढावा घेतला आहे. २२ फेब्रुवारी रोजी ५० जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे.