सोलापूर : कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता सोलापूर शहर व जिल्ह्यात आज २४ फेब्रुवारीपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. ही संचारबंदी ७ मार्चपर्यंत असणार आहे. याशिवाय ७ मार्चपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अशी आहे नियमावली
– आजपासून सोलापुरात ७ मार्चपर्यंत कडक रात्र संचारबंदी
– आज मध्यरात्रीपासून रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी
– कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यातील टेस्टींग वाढविणार
– शाळा-महाविद्यालय ७ मार्चपर्यंत बंद राहणार
– १० वी आणि १२ चे वर्ग सुरु राहणार
– क्रिडांगणावर ७ मार्चपर्यंत कोणत्याही क्रिडा स्पर्धा भरवण्यास बंदी
– लग्नसमारंभासाठी ५० लोकांची मर्यादा
– कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड सेंटर वाढविणार
– कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य