मुंबई : अहमदाबादमधील स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आलं. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. ‘हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते’, असं आव्हाड म्हणाले. तसेच ‘सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरातमधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले’, असंही ते म्हणाले.
अहमदाबादमधील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना थेट हिटलरशी केली आहे. “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं”, असा टोला आव्हाडांनी मोदींना लगावला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्या कसोटी सामन्याआधी मैदानाचं नाव बदलण्यात आलं. हे मैदान मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली आणि संपूर्ण परिसराचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असं करण्यात आलं होतं. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या कॉम्पलेक्समधील क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलत नरेंद्र मोदी स्टेडियम असं देण्यात आलं. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
या नामांतरावरुन जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडलं आहे. “स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते आणि गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”, असं ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे.